५०० पेक्षा अधिक लोकांनी घेतला लाभ
SIF आंतरराष्ट्रीय संस्थेने शांतता आणि समृद्धीला प्रोत्साहन देण्यासाठी पहिल्यांदाच नागपूर शहरात 500 अधिक लोकांसाठी रविवारी दिनांक 27 ऑगस्ट लांबा सेलिब्रेशन येथे एक दिवसीय मेगा मेडिटेशन चे आयोजन केले होते . सर्व नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला . व सर्वानी मोठ्या संख्येने या शिबिराला उपस्थित राहून चांगला प्रतिसाद दिला .
सुन्य समता विपश्यनेचि साधना जगभरात केली जाते, या सोबतच सुन्यती फाउंडेशन सामाजिक उत्थानासाठी अनेक औद्योगिक उपक्रम सुद्धा राबविते.सुन्यती फाउंडेशन शाळा, महाविद्यालये, कॉर्पोरेट संस्था, सरकारी आणि गैर-सरकारी संस्था इत्यादींना प्रशिक्षण देते.
गेल्या वर्षभरापासून नागपूरच्या नागलोक येथे दर महिन्याला तीन दिवसीय निवासी रिट्रीटचे आयोजन नियमितपणे केले जाते. एक दिवसीय ध्यानाचा हा कार्यक्रम 12 शिबीर यशस्वीपणे पूर्ण झाल्या निमित्ताने एक विशेष आयोजन असल्याचे सांगितल्या गेले .
सुन्यती निवासी शिबिरांची प्रवेश मर्यादा आणि वाढती मागणी लक्षात घेऊन फाऊंडेशनने सर्वांसाठी एक दिवसीय रिट्रीट चे आयोजन केले आहे.