सीधे मुख्य सामग्री पर जाएं

मोबाईल टॉवरच्या बॅट-या चोरी करणारी अट्टल टोळी जेरबंद तब्बल २७ गुन्हयाचा उलगडा

 

एकुण २६,७०,१५०/- रुपयाचा मुद्देमाल जप्त (स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीणची कारवाई)

नागपूर ग्रामीण घटकाअंतर्गत मोबाईल टॉवर बॅटरी चोरी करणाऱ्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याकरीता नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री विशाल आनंद यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीण यांचे मार्गदर्शनात दोन विशेष पथके तयार केले. विशेष पथकाने जिल्हयातील विवीध पोलीस स्टेशनला नोंद गुन्हयांचा अभ्यास करुन प्रत्येक चोरीच्या घटनेमधील आरोपींच्या गुन्हे करण्याच्या कार्यपध्दतीवर केंद्र लक्षीत करुन समांतर तपास सुरु केला. तपासादरम्यान प्राप्त तांत्रीक पुराव्यांच्या आधारे कोंढाळी येथे रहाणारा संशयीत आरोपी कलीम उर्फ अलीम शेख वल्द मेहबुब शेख, वय ३४ वर्ष रा. व्दारा फिरोजभाई सलीम गरेवाले, उमाठे नगर, कोंढाळी जि. नागपूर आणि त्याचा साथीदार नजीम उर्फ अकलाक युसूफ पठाण वय २६ वर्ष रा. वार्ड नं. २, विकास नगर, कोंढाळी जि. नागपूर या दोघांना ताब्यात घेतले. दोन्ही आरोपी हे "गावाचे किंवा शहराचे बाहेरील निर्जन स्थळी बसविण्यात आलेले मोबाईल टॉवर ची टेहाळणी करुन मध्यरात्रीचे वेळी मोबाईल टॉवरचे डोअर लॉक तोडून ओडीसी रैंक मधील Costlight/ VRLA बॅटरीजचे केबल कटर, पेचकस व पाना चे सहाय्याने तोडायचे व बॅटरी चोरी करुन चारचाकी वाहनामध्ये घेवून जात होते." दोन्ही आरोपी हे चोरी केलेल्या बॅटरीज् कोंढाळी येथे राहणारा कबाडी फारुख शेख वल्द नुर शेख वय ३८ वर्ष रा. वार्ड नं. ५, बुधवार पेठ, कोंढाळी जि. नागपूर याला विकत होते. फारुख शेख हा पुढे त्या बॅटरीज् अमन वल्द मेहराजउद्दीन मलीक वय २२ वर्ष रा. गल्ली नं. ५, चमन पार्क मुस्तफाबाद दिल्ली. ह.मु. व्दारा कुरैशी, अन्सार नगर, मोमीनपुरा नागपूर याला विकायचा. अमन मलीक हा Costlight बॅटरीज् रेल्वे कुरीयर व्दारे दिल्ली येथील त्याच्या इतर साथीदारांना पाठवित होता. तसेच काही बॅटरीज् त्याने सुशिल जमुनाप्रसाद शाहु वय ३० वर्ष रा. बिनाकी मंगळवारी, शाहु मोहल्ला, नागपूर याला विकल्याचे समोर आले. तपासादरम्यान आरोपीतांकडून १० Costlight बॅटरीज्, ७२ VRLA बॅटरीज् ३ चारचाकी वाहने आणि ०५ मोबाईल फोन असा एकुण २६,७०,१५०/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.


वरील आरोपी हे एकमेकांचे संपर्कात रहायचे त्यांनी संगणमताने टोळी तयार करून खालील नमुद पोलीस स्टेशन हद्दीत फेब्रुवारी २०२२ ते जुलै २०२३ या कालावधीत रिलायन्स जीयो कंपणीचे मोबाईल टॉवर व इंडस कंपणीचे मोबाईल टॉवरच्या बॅटरीज् चोरी केल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत पुढील तपास पोलीस स्टेशन कळमेश्वर तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथकाव्दारे सुरु असुन खालीलप्रमाणे नागपूर ग्रामीण मधील एकुण २०


गुन्हे, नागपूर शहरातील २ गुन्हे व वर्धा जिल्हयातील ५ गुन्हे असे एकुण २७ गुन्हे उघडकीस आणलेले आहे.

१) पो.स्टे. कळमेश्वर गुन्हे रजि.नं. २५१ / २०२३ कलम ३७९ भादवि.

२) पो.स्टे. कळमेश्वर गुन्हे रजि.नं. २७२ / २०२३ कलम ३७९ भादवि. ३) पो.स्टे. कोंढाळी गुन्हे रजि.नं. ५४ / २०२२ कलम ३७९ भादवि.

४) पो.स्टे. कोंढाळी गुन्हे रजि.नं. ५८ / २०२२ कलम ३७९ भादवि.

५) पो.स्टे. कोंढाळी गुन्हे रजि. नं. १०७/२०२३ कलम ३७९ भादवि. ६) पो.स्टे. कोंढाळी गुन्हे रजि.नं. १४७ / २०२३ कलम ३७९ भादवि.

७) पो.स्टे. कोंढाळी गुन्हे रजि.नं. ५८८ / २०२३ कलम ३७९ भादवि. ८) पो.स्टे. काटोल गुन्हे रजि.नं. ३४३ / २०२२ कलम ३७९ भादवि..

९) पो.स्टे. काटोल गुन्हे रजि.नं. ४१९ / २०२२ कलम ३७९ भादवि.

१०) पो.स्टे. काटोल गुन्हे रजि.नं. २३३ / २०२३ कलम ३७९ भादवि. ११) पो.स्टे. काटोल गुन्हे रजि.नं. ४९५ / २०२३ कलम ३७९ भादवि.

११) पो.स्टे. काटोल गुन्हे रजि.नं. ४९५ / २०२३ कलम ३७९ भादवि.

१२) पो.स्टे. जलालखेडा गुन्हे रजि. नं. ४७५ / २०२२ कलम ३७९ भादवि. १३) पो.स्टे. जलालखेडा गुन्हे रजि.नं. १२९ / २०२३ कलम ३७९ भादवि.

१४) पो.स्टे. नरखेड गुन्हे रजि.नं. ३३ / २०२२ कलम ३७९ भादवि. १५) पो.स्टे. नरखेड गुन्हे रजि.नं. १२३ / २०२३ कलम ३७९ भादवि.

१६) पो.स्टे. कुही गुन्हे रजि. नं. ११२ / २०२३ कलम ३७९ भादवि.

१७) पो.स्टे. मौदा गुन्हे रजि.नं. ५८१ / २०२२ कलम ३७९ भादवि. (१८) पो.स्टे. मौदा गुन्हे रजि.नं. ५८२ / २०२२ कलम ३७९ भादवि.

१९) पो.स्टे. मौदा गुन्हे रजि.नं. ६५ / २०२३ कलम ३७९ भादवि.

२०) पो.स्टे. मौदा गुन्हे रजि.नं. २६१ / २०२३ कलम ३७९ भादवि.

२१) पो.स्टे. हिंगणा, नागपूर शहर गुन्हे रजि.नं. ३७२ / २०२३ कलम ३७९ भादवि.

२२) पो.स्टे. वाडी, नागपूर शहर गुन्हे रजि.नं. ३९३ / २०२३ कलम ३७९ भादवि. २३) पो.स्टे. तळेगांव, वर्धा गुन्हे रजि.नं. १९१ / २०२३ कलम ३७९ भादवि.

२४) पो.स्टे. पुलगांव, वर्धा गुन्हे रजि.नं. २८६ / २०२३ कलम ३७९ भादवि.

२५) पो.स्टे. हिंगणघाट, वर्धा गुन्हे रजि.नं. ४१२ / २०२३ कलम ३७९ भादवि.

२६) पो.स्टे. हिंगणघाट, वर्धा गुन्हे रजि.नं. ५२४ / २०२३ कलम ३७९ भादवि. २७) पो.स्टे. देवळी, वर्धा गुन्हे रजि.नं. १३६ / २०२३ कलम ३७९ भादवि.

सदर कार्यवाही ही नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री विशाल आनंद व अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक श्री ओमप्रकाश कोकाटे, सहा. पोलीस निरीक्षक, राजीव कर्मलवार, अनिल राऊत, सहा. फौजदार चंद्रशेखर घडेकर, पोलीस हवालदार दिनेश आधापूरे, ज्ञानेश्वर राऊत, प्रमोद तभाने, निलेश बर्वे, ईक्बाल शेख, आशिष भुरे, पोलीस नायक प्रमोद भोयर, नितेश पिपरोदे, रंजित जाधव, विपीन गायधने, उमेश फुलबेल, निलेश इंगुलकर, चालक पोलीस हवालदार अमोल कुथे, पोलीस नायक मुकेश शुक्ला तसेच सायबर सेलचे पोलीस नायक सतिष राठोड यांनी पार पाडली. सध्या सदर गुन्हयाचा तपास पोलीस स्टेशन कळमेश्वरचे ठाणेदार पोलीस निरीक्षक श्री यशवंत सोलसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नावेद खान, पोलीस शिपाई मनिष सोनवने हे करीत आहे.

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक

 🖊️प्रविण जगताप 🖊️वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो . 9284981757 वर्धा *आज दिनांक ०२ /१० /२०२३ रोजी वर्धा येथे महात्मा लॉन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे जिल्हाध्यक्ष मा श्री सुनीलभाऊ राऊत साहेब यांच्या निर्देशाखाली ही' सभा घेण्यात आली वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक घेण्यासाठी संसदरत्न, कार्यकारी अध्यक्ष, खासदार सौ सुप्रियाताई सुळे , माजी गृहमंत्री मा श्री अनिलभाऊ देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश महिला प्रदेशाध्यक्ष सौ रोहिनिताई खडसे , राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा श्री महेबूबभाई शेख या सर्व दिग्गज नेत्यां च्या नेतृत्वात खाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक घेण्यात आली वर्धा जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते बैठकीनंतर काही युवक व तरुण मुलांचे पक्ष प्रवेश घेण्यात आले हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मा श्री सुधीर बाबूजी कोठारी, माजी आमदार मा श्री राजूभाऊ तिमांडे , प्रदेश सरचिटणीस मा श्री अतुल भाऊ वांदिले , वर्धा जिल्हा अध्यक्ष मा श्री सुनीलभाऊ राऊत, मा श्री समीर भाऊ देशमुख, वर्धा जिल्हा राष्ट्रवादी यु...

PETROCHEMICAL COMPLEX VIABLE IN NAGPUR SAYS EIL REPORT

  PETROCHEMICAL COMPLEX VIABLE IN NAGPUR SAYS EIL REPORT The much-awaited techno-economic feasibility study Report prepared by Engineers India Ltd. (EIL), was handed over to Dr. Vipin Sharma, IAS, CEO - MIDC in Mumbai recently. The handing over was done by Vinayak Marathe, refinery and petrochimal expert in the presence of Varun Phuljhale (EIL), Anil Kumar (EIL), Dr. Vijay Rathod, IAS,Jt. CEO (V), and Upendra Tamore Dep. CEO – MIDC. A presentation was also made by EIL on the subject. Although this is an Interim Report, according to the Report, the petrochemical complex is viable in Nagpur with 8 options of various feedstock comprising naptha and ethane gases. The next step would be handing over the Report to Devendra Fadnavis, DCM and Minister Industries, Uday Samant, (GoM) who would seek investors for the project from among Public Sector Undertakings. Meanwhile, it is understood that Gas Authority of India Ltd. (GAIL) is keen on investing in Maharashtra in a petrochemical complex....

बुद्ध विहार येथे बौद्ध भिक्खूंसाठी पोषण जागृती मालिकेचे चौथे सत्र संपन्न

  *बुद्ध विहार येथे बौद्ध भिक्खूंसाठी पोषण जागृती मालिकेचे चौथे सत्र संपन्न*  *निकिता पाटील, प्रख्यात आहारतज्ञ * बौद्ध भिक्खूंसाठी आहार शिक्षण सत्रांची मालिका सुरू ठेवत, मिठास केअरच्या सहकार्याने न्यूट्रा पॉवरने 8 ऑक्टोबर रोजी बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर बौद्ध सेमिनरी, उंटखाना बुद्ध विहार, नागपूर येथे आपले चौथे सत्र आयोजित केले होते. मिठास केअरचे संस्थापक विवेक नगरारे यांनी भिक्षु संघ आहार शिक्षण सत्र अभियानाच्या दूरदृष्टीची माहिती देऊन सत्राची सुरुवात केली. या अभियाना चे पहले सत्र 22 एप्रिल रोजी मैत्री बुद्ध विहार, नारी रोड, नागपूर येथून झाली आणि ह्याचे उद्दिष्ट 1000 हून अधिक बौद्ध भिक्खूंना आरोग्य व पोषण जागृती चे सशक्ति प्रदान करणे आहे ज्यासाठी कदाचित शहरभरातील 100 बुद्ध विहारांमध्ये प्रवास करण्याची आवश्यकता असू शकते. डॉ.आंबेडकर सेमिनरीचे मुख्य धम्म प्रशिक्षक भदंत धम्मसारथी यांनी संपूर्ण समुह ला त्यांच्या मिशनचा सक्रिय भाग बनवण्याची आणि समाजात पोषण शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी नागपूरच्या विविध बुद्ध विहारांमध्ये जास्तीत जास्त भिक्षूंपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांची बांधिलकी द...