सीधे मुख्य सामग्री पर जाएं

लोकसभेत 45 पेक्षा अधिक जागा येतील !- चंद्रशेखर बावनकुळे

 लोकसभेत 45 पेक्षा अधिक जागा येतील !- चंद्रशेखर बावनकुळे

- लोकसभा प्रवासाचा चंद्रपूर येथून शुभारंभ

- संपर्क से समर्थन, पदाधिकाऱ्यांची संवाद

- चंद्रपूर, वणीत दमदार कार्यक्रम 


चंद्रपूर/वणी 20.अगस्त :  2024 मध्ये मोदीजी पंतप्रधानपदाची शपथ घेतील त्यावेळी चंद्रपूरचा खासदार त्यांच्यासाठी हात उंच करेल. महाराष्ट्रात भाजपा, शिवसेना व अजित पवार सोबतीने 45 हून अधिक लोकसभा जागा निवडून येतील असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. भाजपा कार्यकर्त्याने निश्चय केला असून, काँग्रेसची अमानत जप्त झाल्याशिवाय राहणार नाही, असा दावा त्यांनी केला.


भाजपाच्या राज्यव्यापी लोकसभा प्रवासाची सुरुवात त्यांनी चंद्रपूर येथून केली. संपर्क से समर्थन अभियानांतर्गत त्यांनी चंद्रपूरच्या तुकुम परिसरात आणि वणी येथील शिवाजी चौक परिसरात नागरिकांच्या भेटी घेतल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने मागील नऊ वर्षांत राबविलेल्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचवित संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी या देशातून भ्रष्टाचार उपटून काढण्याचे काम केले. मागील 9 वर्षात एकही दिवस आराम न करता विकासाचा अजेंडा घेऊन काम करीत आहेत. जनतेच्या मतांचे कर्ज ते इमानदारीने विकासकामे करून व्याजासकट परत करीत आहे. 


मागील लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात अपघाताने काँग्रेस चा उमेदवार निवडून आला. आगामी निवडणुकीत असा अपघात होऊ देऊ नका. तसेच, आगामी महापालिका निवडणुकीत काँग्रेसला चंद्रपूरच्या मातीत मिसळून टाका असेही ते यावेळी म्हणाले. चंद्रपूर लोकसभा प्रवासात भाजपा प्रदेश लोकसभा संयोजक बाळा भेगडे, राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, विदर्भ संघटन सरचिटणीस डॉ उपेंद्र कोठेकर, लोकसभा समन्वयक धर्मपाल मेश्राम, चंद्रपूर शहराध्यक्ष राहुल पावडे, जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, यवतमाळ जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, चंद्रपूर लोकसभा निवडणूक प्रमुख, सर्व विधानसभा निवडणूक प्रमुख यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.


• वडेट्टीवारानी बेजबाबदार विधाने करु नयेत!

विजय वडेट्टीवार हे नवीन विरोधी पक्षनेते झाले आहेत. त्यांनी बेजबाबदार विधाने करु नयेत. ते ज्या पदावर आहेत, ते संवैधानिक पद आहे. त्यांच्याजवळ काही माहिती असेल, तर ती तपास यंत्रणेला त्यांनी द्यावी. त्यांचे विधान त्यांच्या पदाला शोभणारे नाही. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न अकारण निर्माण होतील.


• मेश्राम यांची भेट स्मरणीय

चंद्रपूरच्या तुकुम परिसरात ढोल ताशांच्या गजरात त्याच स्वागत झाले. बुरडकर सभागृहात राजूरा बल्लारपूर व चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील भाजपा पदाधिकाऱ्यांना मागदर्शन केले. चंद्रपूर येथे आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते व रिपब्लिकन नेते प्रा. बी.डी. मेश्राम यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यांना मोदी सरकारच्या नऊ वर्षांचा कार्यकाळ व कार्यपद्धतीची माहिती दिली. प्रा. मेश्राम यांनी सविधानाची प्रत मला सस्नेह भेट दिली. ही भेट मला कायम स्मरणात राहणारी असल्याची भावना बावनकुळे यांनी व्यक्त केली. आखिल भारतीय धनोजे कुणबी समाजाचे अध्यक्ष अॅड. पुरुषोत्तम सातपुते यांच्या निवासस्थानी भेट दिली.


• वणीच्या शेतकरी मंदिरात मार्गदर्शन

वणी येथील शिवाजी चौकात जेसीबी लावून पुष्प वर्षाव करून त्यांचे जय्यत स्वागत करण्यात आले. शेतकरी मंदिर येथे वणी, आर्णी आणि वरोरा विधानसभा क्षेत्रातील भाजपा पदाधिकाऱ्यांना मागदर्शन केले. वणीचे प्रसिद्ध व्यावसायिक जयस्वाल समाजाचे अध्यक्ष राजा जयस्वाल याच्या आणि तेली समाजाचे नेते संजय निमकर यांच्या घरी त्यांनी भेट देत भाजपा सरकारच्या कामगिरीची माहिती दिली.


इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक

 🖊️प्रविण जगताप 🖊️वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो . 9284981757 वर्धा *आज दिनांक ०२ /१० /२०२३ रोजी वर्धा येथे महात्मा लॉन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे जिल्हाध्यक्ष मा श्री सुनीलभाऊ राऊत साहेब यांच्या निर्देशाखाली ही' सभा घेण्यात आली वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक घेण्यासाठी संसदरत्न, कार्यकारी अध्यक्ष, खासदार सौ सुप्रियाताई सुळे , माजी गृहमंत्री मा श्री अनिलभाऊ देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश महिला प्रदेशाध्यक्ष सौ रोहिनिताई खडसे , राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा श्री महेबूबभाई शेख या सर्व दिग्गज नेत्यां च्या नेतृत्वात खाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक घेण्यात आली वर्धा जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते बैठकीनंतर काही युवक व तरुण मुलांचे पक्ष प्रवेश घेण्यात आले हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मा श्री सुधीर बाबूजी कोठारी, माजी आमदार मा श्री राजूभाऊ तिमांडे , प्रदेश सरचिटणीस मा श्री अतुल भाऊ वांदिले , वर्धा जिल्हा अध्यक्ष मा श्री सुनीलभाऊ राऊत, मा श्री समीर भाऊ देशमुख, वर्धा जिल्हा राष्ट्रवादी यु...

PETROCHEMICAL COMPLEX VIABLE IN NAGPUR SAYS EIL REPORT

  PETROCHEMICAL COMPLEX VIABLE IN NAGPUR SAYS EIL REPORT The much-awaited techno-economic feasibility study Report prepared by Engineers India Ltd. (EIL), was handed over to Dr. Vipin Sharma, IAS, CEO - MIDC in Mumbai recently. The handing over was done by Vinayak Marathe, refinery and petrochimal expert in the presence of Varun Phuljhale (EIL), Anil Kumar (EIL), Dr. Vijay Rathod, IAS,Jt. CEO (V), and Upendra Tamore Dep. CEO – MIDC. A presentation was also made by EIL on the subject. Although this is an Interim Report, according to the Report, the petrochemical complex is viable in Nagpur with 8 options of various feedstock comprising naptha and ethane gases. The next step would be handing over the Report to Devendra Fadnavis, DCM and Minister Industries, Uday Samant, (GoM) who would seek investors for the project from among Public Sector Undertakings. Meanwhile, it is understood that Gas Authority of India Ltd. (GAIL) is keen on investing in Maharashtra in a petrochemical complex....

बुद्ध विहार येथे बौद्ध भिक्खूंसाठी पोषण जागृती मालिकेचे चौथे सत्र संपन्न

  *बुद्ध विहार येथे बौद्ध भिक्खूंसाठी पोषण जागृती मालिकेचे चौथे सत्र संपन्न*  *निकिता पाटील, प्रख्यात आहारतज्ञ * बौद्ध भिक्खूंसाठी आहार शिक्षण सत्रांची मालिका सुरू ठेवत, मिठास केअरच्या सहकार्याने न्यूट्रा पॉवरने 8 ऑक्टोबर रोजी बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर बौद्ध सेमिनरी, उंटखाना बुद्ध विहार, नागपूर येथे आपले चौथे सत्र आयोजित केले होते. मिठास केअरचे संस्थापक विवेक नगरारे यांनी भिक्षु संघ आहार शिक्षण सत्र अभियानाच्या दूरदृष्टीची माहिती देऊन सत्राची सुरुवात केली. या अभियाना चे पहले सत्र 22 एप्रिल रोजी मैत्री बुद्ध विहार, नारी रोड, नागपूर येथून झाली आणि ह्याचे उद्दिष्ट 1000 हून अधिक बौद्ध भिक्खूंना आरोग्य व पोषण जागृती चे सशक्ति प्रदान करणे आहे ज्यासाठी कदाचित शहरभरातील 100 बुद्ध विहारांमध्ये प्रवास करण्याची आवश्यकता असू शकते. डॉ.आंबेडकर सेमिनरीचे मुख्य धम्म प्रशिक्षक भदंत धम्मसारथी यांनी संपूर्ण समुह ला त्यांच्या मिशनचा सक्रिय भाग बनवण्याची आणि समाजात पोषण शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी नागपूरच्या विविध बुद्ध विहारांमध्ये जास्तीत जास्त भिक्षूंपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांची बांधिलकी द...