नागपुर : दि. १६.०८.२०२३ चे २१.०० वा. ते रात्री ९.३० वा. चे दरम्यान फिर्यादी रवि बच्चन जैस्वाल वय २५ वर्ष, रा. वार्ड नं. ०३, उमरेच्या दवाखान्याजवळ, हिंगणा रोड, राजीव नगर, नागपुर व राकेश चंद्रकांत मिश्रा वय ३२ वर्ष, रा. राजीव नगर, हे पोलीस ठाणे एम.आय.डी.सी. हद्दीत राजकुमार जैसवार याचे राम पान पॅलेस राजीव नगर, येथे , बसुन होते. राकेश मिश्रा यांचे आरोपीचे वडीलासोबत ०२ ते ०३ महीण्या अगोदर झालेले जुन्या भांडणाचे कारणावरून आरोपी अर्जुन रामा दांडेकर व त्याचे ०४ ते ०५ साथीदार यांनी गैर कायदयाची मंडळी जमवुन फिर्यादी व फिर्यादीचा साथीदार यांना जिवानीशी ठार मारण्याचे उद्देश्याने धारदार चाकु, व तलवारी सारख्या शस्त्राने गंभीर जखमी केले.. जख्मी राकेश मिश्रा यांना उपचारकामी पडोळे हॉस्पीटल येथे नेले तेथे त्यांना डॉक्टरांनी तपासुन मृत घोषीत केले. व जख्मी फिर्यादीचा लता मंगेशकर हॉस्पीटल येथे उपचार सुरू आहे. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पो. ठाणे एम.आय.डी.सी येथे आरोपीविरूध्द कलम ३०२, ३०७, १४३, १४४, १४७, १४८, १४९, भादवि सहकलम ४, २५, भा. ह. का. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचे तपासात गुन्हेशाखा युनिट क. ०१ चे अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या माहीतीवरून व सायबर गुन्हे यांचेकडून वेळोवेळी लोकेशन घेउन आरोपींचा शोध घेवुन आरोपी क्र. १) गणेश उर्फ बऱ्या रामा दांडेकर, वय २६ वर्ष, रा. राजीव नगर, वार्ड नं. ५, एमआयडीसी, नागपूर, २) राहुल उर्फ सिनू संजय शिंदे, वय २३ वर्ष, रा. विदर्भ सोसा, संजय किराणा स्टोअर्स समोर, पो.ठाणे. अवधूत वाडी, यवतमाळ ३) देवांश अजय शर्मा, वय २३ वर्ष, रा. गणपती मंदीर जवळ, माळीपुरा, पो.ठाणे. यवतमाळ सिटी, यवतमाळ ४) हसन खान उर्फ गब्बर अन्वर खान, वय २० वर्ष, रा. इंद्रनगर, शारदा चौक, पो. ठाणे. अवधूत वाडी, यवतमाळ ५) वेदांत संतोष मानकर, वय १९ वर्ष, रा. अंबिका नगर, सेजल रेसिडंसी कॉलोनी, पो.ठाणे. यवतमाळ सिटी, यवतमाळ यांना पिंपरी चिंचवड येथुन ताब्यात घेतले.. आरोपी क ०६) अमीर उर्फ अमीरा मुस्तफा शहा, वय १८ वर्ष, रा. राजीव नगर, वार्ड नं. ५, हिंगणा रोड, नागपुर , यांस एम.आय.डी.सी येथून ताब्यात घेतलेत्र आरोपिंना गुन्हयाबाबत विचारले असता त्यांनी सर्वानी मिळुन गुन्हा केल्याचे सांगीतले. आरोपीकडुन वेगवेगळया कंपनीचे ०५ मोबाईल एकुण अ. कि १,१७,०००/- व गुन्हयात वापरलेली टाटा कंपनीची टियागो फोर व्हिलर गाडी क्र.एम.एच.०२ / ई.के.४९३९ कि. अं.५,००,०००/- असा एकुण ६,१७,०००/- मुद्देमाल जप्त करून आरोपींची वैद्यकिय तपासणी करून पुढील कारवाई करीता एम.आय.डी.सी. पोलीसांचे ताब्यात देण्यात आले.
वरिल कामगिरी मा. श्री. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), पोलीस उप आयुक्त, (डिटेक्शन), सपोआ (डिटेक्शन), यांचे मार्गदर्शनाखाली पोनि श्री सुहास चौधरी, सपोनि राजेन्द्र गुप्ता, पोहवा बबन राउत, विनोद देशमुख, नितीन वासनीक, नुतनसिंग छाडी, सुमीत गुजर, नापोअं. मनोज टेकाम, सुशांत सोळंके, रितेश तुमडाम, मनोज टेकाम, हेमंत लोणारे, योगेश वासनीक, अजय शुक्ला, सोनू भावरे, पोअ रवि राउत, शिवशंकर रोठे, रविन्द्र खेडेकर, चंद्रशेखर भारती, नितीन यांनी केली.