नागपूरच्या आंतरराष्ट्रीय सागरी जलतरणपटू जयंत दुबळे ने अमेरिकेतील कॅटलीना चॅनल पोहून रचला नवा इतिहास.
नागपूरच्या आंतरराष्ट्रीय सागरी जलतरणपटू जयंत दुबळे ने अमेरिकेतील कॅटलीना चॅनल पोहून रचला नवा इतिहास.
प्रतिनिधी, अनिल के. बालपांडे, नागपूर.
* जयंत दुबळे ने पंधरा तासाच्या आत अमेरिकेतील कॅटलीना चॅनल पोहून पार केली .
जगातील सात समुद्रांपैकी सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या अमेरिके च्या पॅसिफिक महासागरामध्ये असलेली कॅटलिना चॅनल नागपूरच्या जयंत जयप्रकाश दुबळे एकट्याने सलग 14 तास 52 मिनिटांमध्ये पोहून आंतरराष्ट्रीय जलतरणामध्ये भारताचे नाव अंकित केले . मागील महिन्यामध्ये ब्रिटन येथील इंग्लिश खाडी टू वे इंग्लंड ते फ्रान्स व परत इंग्लंड असे 70 किलोमीटरचे अंतर आपल्या संघासोबत यशस्वीपणे पोहून पूर्ण केले आहे. दोन महिन्याच्या आत आंतरराष्ट्रीय स्तरावरील दोन खाड्या पोहून नवा इतिहास रचला आहे. .
कॅटलिना आयलँड ते सेंड पॅड्रो च्या दरम्यान असलेल्या या खाडीमध्ये जयंत दुबळे ने 14 सप्टेंबर 2023 रोजी च्या रात्री 10 वाजून 54 मिनिटांनी कॅटलिना आयलँड येथील पॅसिफिक महासागरात सूर मारून आपल्या या साहसी जलतरण अभियानाला प्रारंभ केला. दुसऱ्या दिवशी दुपारी 1 वाजून 47 मिनिटांनी म्हणजेच तब्बल 14 तास 52 मिनिटांनी तेरयाना बीच पोहोत गाठले .
*कॅटलिना चॅनेल मधील जलचर प्राणी एक आवाहन :*
जयंतच्या या सागरी साहसी जलतरणाच्या दरम्यान अनेक डॉल्फिन मास्यांचे थवे जयंतच्या चारही बाजूनी ये जा करीत होते. जवळपास तीन तास जयंत सोबत पोहून जणू काही प्रोत्साहन देत होते. पहाटे सहा ते नऊच्या दरम्यान सी लॉयन मधून मधून जयंत च्या जवळ येऊन दूर जात होती. कधी कधी तर जयंतला स्पर्श करून देखील निघून जायची. दुपारच्या सुमारास दोन वेळा व्हेल देखील जयंत च्या बाजूने मधून मधून दिसत होती.
*ऑलम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे ध्येय :*
जगातील सागरी जलतरणपटूंना आव्हान ठरीत असलेल्या सात समुद्रातील सात खाड्या पैकी ब्रिटन व अमेरिका येथील प्रत्येकी एक अशा एकूण दोन खाड्या दोन महिन्याच्या आत यशस्वीपणे पोहल्यामुळे मला आनंद होत आहे . या साहसी जलतरणा च्या अभियानातून देशातील सागरी जलतरणपटूंना ऑलिम्पिक स्पर्धेसाठी नक्कीच प्रेरणा मिळेल, असा विश्वास जयंत ने व्यक्त केला. नागपूर मधून सागरी जलतरणपटू तयार करण्याचाही मानस जयंत ने व्यक्त केला.
*कॅटलिना चॅनेल स्विमिंग फेडरेशन यांचे द्वारा निरीक्षकांची नियुक्ती
कॅटलिना चॅनेल स्विमिंग असोसिएशन ही कॅटलिना चॅनल जलतरण नाचे नियंत्रण करणारी संस्था आहे. बॉटम स्क्रॅचर यांची सुसज्ज असलेली मूनलाईट या बोट वर कॅटलिना चैनल स्विमिंग फेडरेशनचे निरीक्षक श्री जय मुरुगम व रेषेला हे ऑब्झर्वर म्हणून उपस्थित होते. याशिवाय जयंत चे स्विमिंग हे पूर्ण रात्रीच असल्यामुळे तसेच पोट महासागरातील जलचर प्राण्यांचा त्रास होऊ नये म्हणून बोट वरील लाईट लावण्यास मनाई असल्यामुळे कयाकर पॅटरीको व एंजेला हे दोघे सुरक्षेच्या दृष्टीने जयंत सोबत होते . वर्ल्ड ओपन वॉटर स्विमिंग असोसिएशन द्वारा प्रदान करण्यात येत असलेल्या ट्रिपल क्राऊन मधील तीन चॅनेल मध्ये कॅटलीना चॅनेल चा समावेश आहे. कॅटलिना चॅनेल चे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे जलतरणपटूला संपूर्ण रात्रीच हे स्विमिंग करावे लागते. जयंतने ही खाडी पोहण्यासाठी दहा दिवस लॉस एंजल्स येथील कॅब्रीला बीच तसेच रॉक हिल येथील स्विमिंग पूल वर आपला सराव केला होता .
*वयाच्या दहाव्या वर्षापासून सागरी जलतरण स्पर्धा व साहसी अभियानामध्ये जयंतची विजयी घोडदौड :*
जयंत ने यापूर्वी गुजरात शासनाद्वारे आयोजित 35 किलोमीटर अंतराची वीर सावरकर राष्ट्रीय जलतरण स्पर्धा, पश्चिम बंगाल येथील जगातील सर्वात लांब पल्याची 81 किलोमीटर ची स्पर्धा, मुर्शिदाबाद येथील 19 किलोमीटरची स्पर्धा, पोरबंदर येथील दहा किलोमीटरची स्पर्धा तसेच मुंबई व गोवा येथील 110 किलोमीटरचे सागरी अभियान , इंडिया ते श्रीलंका दरम्यानची Palk Strait , नॉर्दन आयर्लंड व स्कॉटलंड दरम्यानची नॉर्थ चॅनल, इंग्लंड व फ्रान्सच्या दरम्यानची इंग्लिश खाडी यशस्वीपणे पोहून विक्रम केलेले आहेत.
22 वर्षीय जयंतने आपल्या वयाच्या दहाव्या वर्षापासून समुद्रा मध्ये पोहणे सुरू केलेले आहे. सद्यस्थितीत ज्योतिबा कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन येथे बी.पी. एड. करीत आहे . नागपूर सारख्या शहराला कोणताही समुद्री किनारा लाभलेला नसतानाही जयतने केलेले हे विक्रम निश्चितच अभिनंदनीय आहे. जयंत च्या या विक्रमामुळे नागपूर शहराला आंतरराष्ट्रीय सागरी जलतरण क्षेत्रात लौकिक प्राप्त झालेला आहे.
*कॅटलीना चैनल पोहण्यासाठी तीन वर्षापासून ची पूर्वतयारी व कठीण मेहनत :*
अमेरिकेतील कॅटरिना चॅनेल पोहण्यासाठी गत तीन वर्षापासून जयंत ने आपली पूर्वतयारी सुरू केली होती. जयंत आपला सराव नागपूर येथील अंबाझरी तलाव तसेच नागपूर सुधार प्रन्यास व सेरसा रेल्वे क्लब, मोतीबाग येथील स्विमिंग पूल वर सराव करीत आहे. जयंत चे वडील डॉ. जयप्रकाश दुबळे जे एक निष्णांत जलतरणपटू असून आंतरराष्ट्रीय स्तरावरील जलतरण प्रशिक्षक आहेत. डॉ. जयप्रकाश दुबळे हे महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा सहसंचालक या पदावर कार्यरत होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जयंत आपला सराव नियमित करीत आहे.
*कॅटलीना चैनल स्विमिंग अभियान स्वर्गीय आईला समर्पित आणि ड्राव्हनिंग प्रिव्हेन्शन व रोड सेफ्टी अवेअरनेस चा संदेश:*
जयंत ने या आंतरराष्ट्रीय सागरी साहसी जलतरण मोहिमेतून ड्राव्हनिंग प्रिव्हेन्शन व रोड सेफ्टी चा संदेश दिला. भारतामध्ये दररोज 90 व्यक्तींचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू होत आहे ,ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. यावर नियंत्रण करण्यासाठी जयंत आपल्या जेडी स्पोर्ट्स फाउंडेशनच्या माध्यमातून ड्राव्हनिंग प्रिव्हेन्शन अवेअरनेस कार्यक्रमांचे आयोजन करून पाण्यातून बुडण्यासाठी सुरक्षा बाळगण्या बाबत तसेच रस्ते अपघाता वर नियंत्रण करण्याच्या दृष्टीने जनजागृतीचेही कार्य करीत आहे.
सन 2021 मध्ये कॅटलिना चैनल पोहण्याचे ठरले होते परंतु कोविड मुळे ते शक्य झाले नाही. याच दरम्यान जयंतच्या आईचा कोविड मुळे निधन झाले . तिचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने जयंतने हे कॅटलिना चॅनल स्विमिंग अभियान आपल्या आईला समर्पित केले.
*जयंत च्या आंतरराष्ट्रीय कामगिरी करिता अभिनंदनचा वर्षाव:*
नागपूरचे खासदार व केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी, उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, क्रीडामंत्री श्री संजय जी बनसोडे माजी खासदार श्री अजय संचेती, माजी मंत्री श्री अनिस अहमद , डॉ. परिणय फुके, आमदार श्री मोहन मते ,श्री प्रवीण दटके , डॉ. अभिजीत वंजारी तसेच श्री गिरीश व्यास, श्री दयाशंकर तिवारी, श्री संदीप जोशी, श्री गिरीश पांडव, प्राचार्य डॉ. विजय दातारकर, क्रीडा संचालक डॉ. शरद सूर्यवंशी, क्रीडा उपसंचालक श्री शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, श्री संजय फांजे,
डॉ. संभाजी भोसले, श्री मंगेश डुके, डॉ.ज्ञानेश ढाकुलकर, सुशील दूरगकर, रामेश्वर लिखार, महाराजा टॉवर निवासी, बिग फ्लेक्स ,डॉ. केविन अग्रवाल , यांनी अभिनंदन केले.