सीधे मुख्य सामग्री पर जाएं

अनुसूचित जाती वस्ती संपर्क अभियानाला सुरूवात

 अनुसूचित जाती वस्ती संपर्क अभियानाला सुरूवात

१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर सेवा पखवाडा

नागपूर. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर हा कालावधी सेवा पखवाडा म्हणून जाहीर केलेला आहे. याअंतर्गत देशात विविध अभियान राबविण्यात येत आहेत. यापैकीच एक ‘अनुसूचित जाती वस्ती संपर्क अभियान’ला २६ सप्टेंबरपासून सुरूवात झालेली आहे. अभियानाच्या अंमलबजावणीसंदर्भात नुकतीच नागपूर शहरात बैठक पार पडली. 

अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीच्या दृष्टीने भाजपा उपाध्यक्ष अॅड. धर्मपाल मेश्राम यांच्यावर अभियान संयोजक म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. बैठकीत अॅड. मेश्राम यांनी अभियानाची सविस्तर माहिती स्पष्ट केली. 

बैठकीला ह्यावेळी विदर्भ संघटनमंत्री डॉ उपेंद्रजी कोठेकर, माजी आमदार डॉ. मिलिंद माने, शहर भाजप महामंत्री संदीप गवई, रामभाऊ अंबुलकर व विलास त्रिवेदी, माजी मनपा सत्तापक्ष नेते संदीप जाधव, शहर अनुसूचित जाती मोर्चा शहर अध्यक्ष राजेश हाथिबेड, शहर अभियान संयोजक सतीश शिरसवान, प्रभाकर मेश्राम व सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.


यावेळी बोलताना भाजपा प्रदेश उपाध्यक्ष व अभियानाचे संयोजक अॅड. धर्मपाल मेश्राम यांनी देशाचे मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतील ‘अनुसूचित जाती वस्ती संपर्क अभियान’ घराघरात पोहोचविण्यासाठी राज्याचे मा. प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या आदेशानुसार कार्य सुरू झाल्याची माहिती दिली. २०१४ ते २०२३ या काळात देशाचे मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात अनुसूचित जातीच्या कल्याणार्थ झालेली कामे ‘अनुसूचित जाती वस्ती संपर्क अभियान’च्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यात येईल, असेही अॅड. मेश्राम यांनी सांगितले. मा. प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या जनधन योजना, उज्ज्वला गॅस योजना, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छतेसाठी शौचालयाची योजना या सर्व कल्याणकारी योजनांचा सर्वाधिक लाभ अनुसूचित जातीतील व्यक्तींनाच मिळाला आहे. खऱ्या अर्थाने मोदीजींनीच अनुसूचित जातीच्या विकासासाठी काम केले आहे. अनुसूचित जातीच्या विकासामध्ये कुठलिही अडचण आल्यास त्यावर तात्काळ मार्ग काढता यावा यादृष्टीने कधी नव्हे ते देशाच्या मंत्रीमंडळात सर्वाधिक १२ अनुसूचित जातीच्या मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे.

श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्र राज्यामध्ये मा. प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांचे कार्य सुदूर पोहोचविण्याच्या दृष्टीने मोठा पुढाकार घेतला. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून लंडन येथे बाबासाहेब निवासास असलेला बंगला खरेदी करणे असो की इंदू मिलच्या जागेसाठी केंद्राकडे पाठपुरावा करून ती जागा प्राप्त करणे असो, प्राप्त केलेल्या इंदू मिलच्या जागेवर स्मारकाच्या निर्मिसाठी आवश्यक कार्यवाही ते मा. प्रधानमंत्री श्री. मोदीजींच्या हस्ते भूमिपूजन या सर्वांमध्ये देवेंद्रजी फडणवीस यांचे मोठे योगदान आहे. उपमुख्यमंत्री म्हणूनही अनेक प्रलंबित प्रकल्प, कामांना गती देण्याचे काम त्यांनी केले. जपानच्या कोयासन वि‌द्यापीठात बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, रशिया येथे साहित्यभूषण अण्णाभाऊ साठे यांचा पूतळा स्थापन करणे, दीक्षाभूमीच्या विकासासाठी २०० कोटीचा निधी तर दीक्षाभूमी, चैत्यभूमीला पर्यटनाचा ‘अ’ मिळवून देणे असो की बाबासाहेबांच्या वापरातील वस्तू, साहित्याचा संग्रह असलेले चिचोली येथील शांतीवन संग्रहालय या सर्वांचा विकास करण्यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार इतिहास नोंदविली जाणारी बाब आहे.  

मा. प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांच्या या अनुसूचित जातीच्या विकासाच्या संकल्पनेला केंद्रीय मंत्री मा. श्री. नितीनजी गडकरी यांची मोठी साथ मिळालेली आहे. १० हजार कोटींच्या बुद्धिस्ट सर्कीटची या सर्वांमध्ये मा. श्री. गडकरी यांनी महत्वाची भूमिका निभावली आहे. हे सर्व कार्य समाजातील वस्त्यांमध्ये शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवून त्यांना पक्षाच्या विचारधारेशी जोडण्यासाठी पुढे या, असे आवाहन अॅड. धर्मपाल मेश्राम यांनी बैठकीत केले. डॉ उपेंद्रजी कोठेकर यांनी समारोपिय मार्गदर्शन केले व अभियानाच्या यशस्वीतेकरिता यथोचित सूचना केल्यात.

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक

 🖊️प्रविण जगताप 🖊️वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो . 9284981757 वर्धा *आज दिनांक ०२ /१० /२०२३ रोजी वर्धा येथे महात्मा लॉन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे जिल्हाध्यक्ष मा श्री सुनीलभाऊ राऊत साहेब यांच्या निर्देशाखाली ही' सभा घेण्यात आली वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक घेण्यासाठी संसदरत्न, कार्यकारी अध्यक्ष, खासदार सौ सुप्रियाताई सुळे , माजी गृहमंत्री मा श्री अनिलभाऊ देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश महिला प्रदेशाध्यक्ष सौ रोहिनिताई खडसे , राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा श्री महेबूबभाई शेख या सर्व दिग्गज नेत्यां च्या नेतृत्वात खाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक घेण्यात आली वर्धा जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते बैठकीनंतर काही युवक व तरुण मुलांचे पक्ष प्रवेश घेण्यात आले हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मा श्री सुधीर बाबूजी कोठारी, माजी आमदार मा श्री राजूभाऊ तिमांडे , प्रदेश सरचिटणीस मा श्री अतुल भाऊ वांदिले , वर्धा जिल्हा अध्यक्ष मा श्री सुनीलभाऊ राऊत, मा श्री समीर भाऊ देशमुख, वर्धा जिल्हा राष्ट्रवादी यु...

बुद्ध विहार येथे बौद्ध भिक्खूंसाठी पोषण जागृती मालिकेचे चौथे सत्र संपन्न

  *बुद्ध विहार येथे बौद्ध भिक्खूंसाठी पोषण जागृती मालिकेचे चौथे सत्र संपन्न*  *निकिता पाटील, प्रख्यात आहारतज्ञ * बौद्ध भिक्खूंसाठी आहार शिक्षण सत्रांची मालिका सुरू ठेवत, मिठास केअरच्या सहकार्याने न्यूट्रा पॉवरने 8 ऑक्टोबर रोजी बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर बौद्ध सेमिनरी, उंटखाना बुद्ध विहार, नागपूर येथे आपले चौथे सत्र आयोजित केले होते. मिठास केअरचे संस्थापक विवेक नगरारे यांनी भिक्षु संघ आहार शिक्षण सत्र अभियानाच्या दूरदृष्टीची माहिती देऊन सत्राची सुरुवात केली. या अभियाना चे पहले सत्र 22 एप्रिल रोजी मैत्री बुद्ध विहार, नारी रोड, नागपूर येथून झाली आणि ह्याचे उद्दिष्ट 1000 हून अधिक बौद्ध भिक्खूंना आरोग्य व पोषण जागृती चे सशक्ति प्रदान करणे आहे ज्यासाठी कदाचित शहरभरातील 100 बुद्ध विहारांमध्ये प्रवास करण्याची आवश्यकता असू शकते. डॉ.आंबेडकर सेमिनरीचे मुख्य धम्म प्रशिक्षक भदंत धम्मसारथी यांनी संपूर्ण समुह ला त्यांच्या मिशनचा सक्रिय भाग बनवण्याची आणि समाजात पोषण शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी नागपूरच्या विविध बुद्ध विहारांमध्ये जास्तीत जास्त भिक्षूंपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांची बांधिलकी द...

10 हजार से ज्यादा भक्तों ने लिया महाप्रसाद का लाभ -विदर्भ के 11 जिलों से आये भक्तों द्वारा रोग निदान,नेत्र जांच ,रक्तदान शिबिर में लिया लाभ

 10 हजार से ज्यादा भक्तों ने लिया महाप्रसाद का लाभ -विदर्भ के 11 जिलों से आये भक्तों द्वारा रोग निदान,नेत्र जांच ,रक्तदान शिबिर में लिया लाभ नागपुर. ((आनन्दमनोहर जोशी) श्राद्ध पक्ष के दौरान सोमवार की चतुर्थी को संकष्टी चतुर्थी से चतुर्दशी तक उत्सव मनाया जा रहा है.वहीँ महल स्थित सीनियर भोसला पैलेस महल में महाराजा ऑफ नागपुर ट्रस्ट के तत्वावधान मे 236 वें वार्षिकोत्सव पर मस्करया श्रीगणेश की विधिवत पूजा रोजाना शाम को राजपुरोहित राजेंद्र पुराणिक के हस्ते मंत्रोच्चारण किया जा रहा है.सरकारी मेडिकल कॉलेज डॉक्टर की टीम ने सफलतापूर्वक प्रयास किया. यहाँ इस दौरान विदर्भ के 11 जिलों से आये भक्तगणों ने स्वास्थ्य शिबिर का लाभ लिया. महाप्रसाद के दौरान अन्न का थालियाँ में उचित मात्रा में प्रसाद के रूप में लेकर जूठा नहीं छोड़ने के लिए सारंग,गणेश गरुड़ और कार्यकर्ताओं द्वारा उद्धोषणा करके निवेदन किये गए.इस विशेष अवसर पर श्रीमंत डॉ. राजे मुधोजी महाराज भोंसले, श्रीमंत रानी यशोधराराजे, श्रीमंत राजे रघुजी भोंसले, श्रीमंत राजे युवराज जयसिंहराव भोंसले,क़ानूनी सलाहकार अधिवक्ता प्रदीप देशमुख, हप्पेनिंग टुडे क...