वर्धा सायबर यांनी हरविलेले 288 मोबाईल शोधुन त्यांचे मुळ मालकांना सुपूर्त केल्याबाबत.
दिनांक 23.09.2023 वर्धा : मोबाईल हा मनुष्याच्या जिवनातील अंगभुत घटक बनलेला आहे. सर्वच बाबतीत मोबाईल उपयोगी पडत आहे. मात्र अनेकदा मोबाईल चोरीस जाण्याच्या घटनाही घडत आहे तसेच अनेकवेळा मोबाईल नकळत हरविलेही जातात. जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन हद्दीत गहाळ झालेल्या मोबाईलच्या तक्रारीचे प्रमाण वाढले असुन महागडे अँन्ड्राईड मोबाईल गहाळ झाल्याने नागरीकांची हिरमोड होते. अशा नागरीकांना त्यांचे मोबाईल परत मिळवुन कसे देता येतील याची योजना मा. पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन यांनी 'आखली व सदरची जबाबदारी वर्धा सायबर यांना देण्यात आली होती. त्यावरून वर्धा सायबर पथकाने दैनंदिन कामकाज सांभाळुन हरविलेल्या मोबाईलचे शोध घेण्याचे आदेश प्राप्त होताच मोबाईल फोनचे शोध कार्य सुरु केले. सदर शोधमोहीम दरम्यान चालु वर्षात वर्धा जिल्ह्यात हरविलेले मोबाईल पैकी वर्धा जिल्ह्यातून व आजुबाजुचे जिल्ह्यातुन एकुण 288 मोबाईल एकुण कि. 29.47,700 रु. चे हस्तगत करण्यात आले.
दिनांक 23.09.2023 रोजी मा. पोलीस अधीक्षक, वर्धा यांचे आदेशाप्रमाणे हस्तगत करण्यात आलेले मोबाईल हे त्यांचे मुळ मालकांना परत करणेकरीता आशीर्वाद मंगल कार्यालय, पोलीस मुख्यालय, व येथे कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. सदर कार्यक्रम जिल्हा विधीसेवा प्राधिकरण सचिव श्री. विवेक देशमुख यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आला असुन सदर कार्यक्रमाकरीता 156 नागरीक उपस्थित झाल्याने नागरीकांचे तक्रारीची खात्री करुन त्यांना त्यांचे मोबाईल सुपुर्त करण्यात आले.
सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक, श्री. नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर रतनकुमार कवडे, पोलीस उप अधीक्षक (गृह) श्री मनोज वाडीवे यांचे मार्गदर्शनात पो. नि. कांचन पांडे सायबर पोलीस स्टेशन, वर्धा, पो. नि. संजय गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा. स. पो. नि. संदिप कापडे, सायबर सेल, वर्धा यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस अंमलदार दिनेश बोधकर, निलेश कट्टोजवार, मिना कौरती, कुलदिप टांकसाळे, विशाल मडावी, अनुप कावळे, अक्षय राऊत, गोविंद मुंडे, अंकित जिभे, स्मिता महाजन सर्व नेमणुक सायबर सेल, वर्धा तसेच पोलीस अंमलदार वैभव कट्टोजवार, निलेश तेलरांधे, रंजीत जाधव, अनुप राऊत, अमित शुक्ला, प्रतिक वांदिले, लेखा राठोड सर्व नेमणुक सायबर पोलीस स्टेशन वर्धा यांनी केली.