हिंगणा तालुक्यात पावसाचे थैमान* *विजांच्या कडकाटानी वाढविले हृदयाचे ठोके
*पुरग्रस्त भागाची आमदार मेघेनी केली पहाणी*
हिंगणा : रमेश पाटील : शुक्रवारी रात्री उशिरा शनिवारी सकाळ पर्यंत पावसाने आणि विजेच्या कडकडाटाने नागरिकांच्या हृदयाचे ठोके वाढविले होते.तालुक्याच्या शहरी आणि ग्रामीण भागातील शेतीतील पिके वाहून गेली आणि अनेक घरांमध्ये पाणी घुसल्याने घरातील सामानाचे नुकसान झाले आहे. विजांचे कडकडाटांसह नागपूर जिल्ह्यातील अनेक भागात अतिवृष्टी झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.अमरनगर नाल्याला मोठा पूर आल्याने जय मंगल कॉलनी, सातपुते लेआउट, तरपटे लेआऊट, जगताप लेआउट, इस्माईल लेआउट, या परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या घरात पाणी शिरलेले आहे.
तसेच नितेश खुजणारे यांचे पाणी फिल्टर प्लांट व संपूर्ण टाटा एस व वाहने पाण्यात डुंबून त्यांचे सुद्धा लाखोंनी नुकसान झालेले आहे. मतदारसंघातील प्रभावीत पुरग्रस्त भागाची पाहणी आमदार समीर मेघे यांनी केली. सदर दौ-यात त्यांनी डिगडोह (देवी), निलडोह, फेटरी व वाडी या शहरी भागास आणि बोरगांव (खुर्द), भरतवाडा व पारडी येथील ग्रामीण भागात दि. 23.09.2023 रोजी भेट दिली. त्याप्रसंगी त्यांनी बाजारपेठांमधील व्यवसायीक, दुकानदार व व्यापारी यांचेसोबत चर्चा करुन झालेल्या नुकसानीची माहिती जाणून घेतली. तसेच बोरगांव (खुर्द), भरतवाडा आणि पारडी येथील प्रभावित शेतातील पिकांची व पुरपरिस्थितीची सुध्दा पाहणी करुन शेतक-यांना दिलासा दिला. या अतिवृष्टीने पाणी बाजरपेठांमधील दुकाने व लोकांच्या घरात पाणी गेल्यामूळे मोठे नुकसान झाले आहे.
हिंगणा मतदारसंघ नागपूर शहराच्या सिमेलगत लागून आहे. काल झालेल्या अतिवृष्टीमूळे हिंगणा मतदारसंघातील अनेक मोठ्या गावांमधील बाजारपेठा आणि नागरीकांची घरे पाण्याखाली आल्यामूळे प्रचंड नुकसान झाल्याचे प्रभावीत कुटुंबिय आणि व्यवसायीकांनी सांगीतले. या भागातील अनेक जुन्या व जेष्ट नागरीकांनी अशी अतिवृष्टी व विजांचा कडकडाटासह अत्यंत भितीदायक वातावरण अनुभवले नसल्याचे सांगीतले. आमदार समीर मेघे यांनी भेट दिलेल्या शहर/गावांमधील जनमाणसांसोबत चर्चा केली.