बाल गंगाधर टिळकांच्या संकल्पनेतून झालेल्या सार्वजनिक गणेशोत्सवा च्या स्थापनेची परंपरा जोपासण्याचा प्रयत्न "युवक गणेश मंडळ करतआहे
साकारली रायगड किल्ल्याची प्रतिकृती.
प्रतिनिधी, अनिल के. बालपांडे, नागपूर.
नागपुर : बाल गंगाधर टिळकांच्या संकल्पनेतून झालेल्या सार्वजनिक गणेशोत्सवा च्या स्थापनेची परंपरा जोपासण्याचा प्रयत्न "युवक गणेश मंडळ, सोशल फाउंडेशन, हनुमान मंदिर, त्रिमूर्ती नगर, नागपूर करत आहे.
शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यास 350 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भव्य अशा रायगड किल्ल्याची प्रतिकृती या मंडळाद्वारे साकारण्यात आली आहे. नागपूरातील सर्व गणेश भक्तांना त्यांचे साक्षात भव्य दर्शन घडवून देत आहे. बाप्पाच्या स्थापनेसह शिवाजी महाराजांचे कुलदैवत तुळजाभवानी सोबत महाराजांच्या मूर्तीची सुद्धा स्थापना येथे झाली आहे.
गेल्या 22 वर्षापासून हे मंडळ निस्वार्थ सांस्कृतिक वारसा जपून सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. पर्यावरण पूरक गणपती, मंडळातील सर्व लहान मोठ्या द्वारा भक्तगणांनी दिल्या गेलेल्या निस्वार्थ सेवेबद्दल एक मानाचे मंडळ म्हणून ओळखल्या जाते. यावेळी इतर कार्यक्रमांसोबत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजन मंडळाची उत्तम प्रस्तुती भक्तगणांना दिल्या गेली. आयोजन मंडळाचे अध्यक्ष, देवदत्त डेहनकर यांच्यासह सचिन पराते, अनिकेत खानोरकर, सतीश बोकडे, योगेश पठारे, भारत पुंडे, राजेश तुरकर, भूषण जोशी आदीं कार्यरत आहे.