*मराठी लघुलेखन व्यवसाय अभ्यासक्रमाला सुरुवात*
*प्रवेशासंबंधी माहिती :
नागपूर : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, श्रध्दानंद पेठ, नागपूर येथे नव्याने मराठी लघुलेखन व्यवसाय अभ्यासक्रम मा. संचालक, महाराष्ट्र राज्य, कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ, मुंबई यांचेमार्फत इयत्ता दहावी शालांत परिक्षा आधारित एक वर्षांचा व्यवसाय प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू होणार आहे. तरी इच्छूक उमेदवारांनी दि.10.10.2023 पूर्वी आपल्या शैक्षणिक कागदपत्रासह अर्ज भरून द्यावयाचे आहे. त्यानंतर गुणवत्ता यादी तयार करून प्रवेश दिल्या जाईल. नियमित प्रशिक्षण 16.10.2023 पासून सुरू होणार आहे.
अधिक माहितीसाठी संस्थेचे शिल्पनिदेशक व्ही.एन.काळबांडे ( 9975325714 ) आणि नितिन ठाकरे, गटनिदेशक (9423679404) किंवा प्रशिक्षण विभाग यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन संस्थेचे उपसंचालक प्रमोद ठाकरे यांनी केले आहे.