सर्वसाधारण सभा तसेच महिला सक्षमीकरण व सबलीकरण संदर्भात विचार मंथन
नागपुर : रविवारी नुकत्याच झालेल्या बैठकीत गोंडवाना गणतंत्र पार्टी महिला प्रकोष्ठ नागपूर जिल्हाच्या वतीने सरपंच भवन जिल्हाधिकारी कार्यालय समोर नागपूर येथे सर्वसाधारण सभा तसेच महिला सक्षमीकरण व सबलीकरण संदर्भात विचार मंथन करण्याकरिता पक्ष वाढीच्या संदर्भात व त्याचबरोबर महिलांचा सत्कार समारंभ गंगाताई टेकाम यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात करण्यात आला होता.
कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे प्रा. सुमित्राताई टेकाम जेष्ठ समाजसेविका प्रमुख वक्ते म्हणून लाभले होते. तसेच प्रमुख पाहुणे सुनीताताई उईके राष्ट्रीय महासचिव, सत्यफुला मडावी महासचिव नागपूर जिल्हा लताताई मरसकोल्हे निशा सिडाम शहर अध्यक्ष पारशिवणी लताताई उईके काटोल अध्यक्ष मंचावर उपस्थित होते. तसेच आज गोंडवाणा गणतंत्र पार्टी महिला शक्ती बळकटीकरण करीता नागपूर जिल्ह्यामध्ये 52 पदनियुक्त करण्यात आले. यावेळी प्रिती पंधराम नागपूर जिल्हा उपाध्यक्ष, शिला मरसकोल्हे अध्यक्ष नागपूर शहर, मिना कोडापे उपाध्यक्ष नागपूर शहर शितल मडावी नागपूर शहर सचिव दिपाली उसेंडी महामंत्री नागपूर शहर महिला प्रकोष्ठच्या उपस्थितीत नियुक्त्या देण्यात आले. तसेच सभेला समस्त महिला उपस्थित होत्या.