ओबीसी विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी , वसतीगृहासाठी,आधार योजना,परदेशी शिष्यवृत्ती मागण्या पूर्ण करण्यासाठी भीक मांगो आंदोलन करण्यात आले.
नागपुर : ओबीसी, व्हीजे एनटी, एसबीसी विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक मागण्यांसाठी दिनांक 21 सप्टेंबर, 2023 रोजी भीक मांगो सत्याग्रहाच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे.
मागील 6 वर्षांपासून ओबीसी विद्यार्थ्यांच्या 72 वसतीगृहाचा विषय शासनाने अजूनही सोडवला नाही.
राज्य शासनाचा वित्त विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग आताही गंभीर नाही. यामुळे पुन्हा एकदा ओबीसी विद्यार्थी वसतिगृहे आणि आधार योजनेपासून वंचित राहू शकतात.
शाळा महाविद्यालये सुरू होवून 3 महिने उलटले आहेत तरी 7200 विद्यार्थ्यांसाठी 72ओबीसी वसतिगृहे, 21600 विद्यार्थ्यांसाठी सावित्रीबाई फुले आधार योजना, 75 विद्यार्थ्यांसाठी विदेश शिष्यवृत्ती योजना यावर निर्णय झालेला असतांना अजूनही वरील योजना शासनाने सुरू केल्या नाहीत.
वरील योजना महाराष्ट्र शासनाच्या वित्त व बहुजन कल्याण विभागाने अडवून ठेवल्या आहेत.
चालढकल करत शासन ओबीसी समाजावर अन्याय करत आहे.52% च्या वर असलेल्या कष्टकरी ,अन्नदाता समाजाची शासनाला पर्वा नाही.
शासनाकडे ओबीसी विद्यार्थ्यांच्या हितासाठी निधी नाही. या सर्व बाबींचा निषेध करण्यासाठी भीक मांगो आंदोलन करण्यात आले.या माध्यमातून मिळालेली भीक शासनाच्या वित्त विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभागास मनी ऑर्डर द्वारे पाठविण्यात आली.