सीधे मुख्य सामग्री पर जाएं

सुपर वॉरिअर्स’ ठरणार विजयाचे शिल्पकार*- चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपादन

*‘सुपर वॉरिअर्स’ ठरणार विजयाचे शिल्पकार*- चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपादन

• राज्यभरात ३० हजार सुपर वॉरिअर्सची नियुक्ती

• नागपूर लोकसभा प्रवासात पदाधिकाऱ्यांशी संवाद

नागपूर, दि. 30.09.2023 भाजपा राज्यभरात ३० हजार सुपर वॉरिअर्स तयार करणार असून ते पुढील तेरा महिन्यात दररोज तीन तास काम करून भाजपाच्या विजयाचे शिल्पकार होतील, असा विश्वास व्यक्त करुन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले,' नरेंद्र मोदी हेच पुन्हा देशाच्या पंतप्रधानपदी आरूढ होतील, तर राज्यातही भाजपाच्या नेतृत्त्वात पुन्हा महायुतीचेच सरकार नवा इतिहास घडवेल.'

नागपूर लोकसभा प्रवासात शनिवारी त्यांनी सर्व सहा विधानसभा क्षेत्रातील सुपर वॉरिअर्स (प्रमुख पदाधिकारी) यांच्याशी संवाद साधला. शिक्षक सहकारी बॅंकेच्या सभागृहात पूर्व व मध्य नागपूर विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मार्गदर्शन केले. त्यानंतर दक्षिण व दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. सायंकाळी त्यांनी जरीपटका येथील महात्मा गांधी हायस्कूलमध्ये पश्चिम व उत्तर नागपूर विधानसभा क्षेत्रातील सुपर वॉरिअर्सशी चर्चा केली. या वेळी मध्य नागपूर विधानसभा क्षेत्रातील युवकांनी भाजपात प्रवेश केला. 

प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्यात प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे, धर्मपाल मेश्राम, भाजपाचे विभागीय संघटन सरचिटणीस डॉ. उपेंद्र कोठेकर, नागपूर लोकसभा निवडणूक प्रमुख आ. प्रवीण दटके, नागपूर शहराध्यक्ष बंटी कुकडे, आ. विकास कुंभारे, आ. मोहन मते, माजी आ. अनिल सोले, माजी आ. मिलिंद माने, भाजपा व्यापारी आघाडी प्रदेशाध्यक्ष विक्की कुकरेजा, भाजपा विधी आघाडी प्रदेश अध्यक्ष उदय डबले, माजी महापौर दयाशंकर तिवारी, नंदा जिचकार, माया इवनाते, मिलिंद कानडे, किशोर वानखेडे, विष्णू चांगदे, संदीप गवई, बाल्या बोरकर, श्रीकांत आगलावे, प्रमोद पेंडके, रामभाऊ आंबुलकर, किशोर वानखेडे, डिम्पी बजाज, विलास त्रिवेदी यांच्यासह सर्व विधानसभा निवडणूक प्रमुख, समन्वयक, मंडल अध्यक्ष तथा जिल्हा कार्यकारिणीतील सदस्य व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.


मतदारांना दीड कोटीपर्यंतचा लाभ

श्री बावनकुळे म्हणाले, पंचायत ते लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी सुपर वॉरिअर्स ५१ टक्के मते मिळावित यासाठी नियोजन करतील. मोदी सरकारने प्रत्येक बुथवर विविध योजनेच्या माध्यमातून नागरिकांना एक ते दीड कोटी रुपयांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष लाभ दिला आहे. कोविड लसीकरण, आयुष्यमान भारत, मोफत अन्न योजना, किसान सन्मान निधी व आता विश्वकर्मा योजना अशा योजनांतून हा फायदा झाला आहे. चांद्रयान मोहीम व जी२० मुळे भारताचा जगभरात वाढलेला सन्मान हा भाजपा कार्यकर्त्यांची शिदोरी आहे, असेही ते म्हणाले. 

• जनतेच्या मनात केवळ मोदीच 

अहमदनगर येथे घरचलो अभियानात सामील झाल्यावर छोट्या व्यावसायिकांपासून ते मोठ्या प्रतिष्ठान मालकांशी संवाद साधला, त्यांना पुढचा पंतप्रधान कोण हा साधा प्रश्न विचारल्यावर त्यांनी मोदी-मोदी हे नारे लावायला सुरुवात केली. जनतेला नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान व्हावे, असे वाटते. त्यांना राहूल आठवत नाही, ना ममता आठविते. मात्र माझ्या या व्हिडीओचा अपप्रचार करण्यात आला, तसे काही नव्हते असेही ते म्हणाले. 


इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक

 🖊️प्रविण जगताप 🖊️वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो . 9284981757 वर्धा *आज दिनांक ०२ /१० /२०२३ रोजी वर्धा येथे महात्मा लॉन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे जिल्हाध्यक्ष मा श्री सुनीलभाऊ राऊत साहेब यांच्या निर्देशाखाली ही' सभा घेण्यात आली वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक घेण्यासाठी संसदरत्न, कार्यकारी अध्यक्ष, खासदार सौ सुप्रियाताई सुळे , माजी गृहमंत्री मा श्री अनिलभाऊ देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश महिला प्रदेशाध्यक्ष सौ रोहिनिताई खडसे , राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा श्री महेबूबभाई शेख या सर्व दिग्गज नेत्यां च्या नेतृत्वात खाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक घेण्यात आली वर्धा जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते बैठकीनंतर काही युवक व तरुण मुलांचे पक्ष प्रवेश घेण्यात आले हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मा श्री सुधीर बाबूजी कोठारी, माजी आमदार मा श्री राजूभाऊ तिमांडे , प्रदेश सरचिटणीस मा श्री अतुल भाऊ वांदिले , वर्धा जिल्हा अध्यक्ष मा श्री सुनीलभाऊ राऊत, मा श्री समीर भाऊ देशमुख, वर्धा जिल्हा राष्ट्रवादी यु...

दारुच्या नशेत एसटी चालविणाऱ्या चालकास पोलिसांनी घेतले ताब्यात.वेळ सावधतेने प्रवाशांचे वाचले जीव.

 दारुच्या नशेत एसटी चालविणाऱ्या चालकास पोलिसांनी घेतले ताब्यात.वेळ सावधतेने प्रवाशांचे वाचले जीव. यवतमाळ – मदयधुंद अवस्थेत एस.टी. बस चालविने पडले महाग. २२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या चालकाची जेलम ध्ये रवानगी करण्यात आली.सविस्तर वृत्त असे की दि.२२/०८/२०२३ रोजी सकाळी यवतमाळ ते छत्रपती संभाजी नगर ला जाणारी यवतमाळ आगाराची एस.टी.बस MH ४०CM ५१२१ हि दारव्हा बस स्थानकावरून २२ प्रवाशांसह रवाना झाली या बस मध्ये बालक म्हणुन नारायन मारोती एकुंडवार तर वाहक म्हणुन प्रशांत पांडुरंग भगत असे नेमणुकीस होते. बस दारव्हा येथुन निघुन कारंजा रोडवर ५ किमी अंतरावरील चिखली फाटा येथे पोहचली असता बस वेडी वाकडी धाऊ लागली प्रवाशांनी आरडा ओरड करताच चालकाने बस थांबविली व स्टेअरींग वर त्याने मान टाकली प्रवाशांनी चालकास विचारपुस केली असता तो पुर्णपणे दारूच्या नसेत असल्याचे व त्यास बोलता बघता देखील येत नसल्याचे दिसुन आले. या बाबत वाहक भगत यांनी दारव्हा आगाराला माहीती देताच आगाराच्या अधिका-यानी घटनास्थळी जावुन चालकास ताब्यात घेवुन पोलीस स्टेशन ला हजर केले. पोलीस स्टेशन ला देखील चालक नारायन ऐकुंडवार यास निट उभे राहता ये...

PETROCHEMICAL COMPLEX VIABLE IN NAGPUR SAYS EIL REPORT

  PETROCHEMICAL COMPLEX VIABLE IN NAGPUR SAYS EIL REPORT The much-awaited techno-economic feasibility study Report prepared by Engineers India Ltd. (EIL), was handed over to Dr. Vipin Sharma, IAS, CEO - MIDC in Mumbai recently. The handing over was done by Vinayak Marathe, refinery and petrochimal expert in the presence of Varun Phuljhale (EIL), Anil Kumar (EIL), Dr. Vijay Rathod, IAS,Jt. CEO (V), and Upendra Tamore Dep. CEO – MIDC. A presentation was also made by EIL on the subject. Although this is an Interim Report, according to the Report, the petrochemical complex is viable in Nagpur with 8 options of various feedstock comprising naptha and ethane gases. The next step would be handing over the Report to Devendra Fadnavis, DCM and Minister Industries, Uday Samant, (GoM) who would seek investors for the project from among Public Sector Undertakings. Meanwhile, it is understood that Gas Authority of India Ltd. (GAIL) is keen on investing in Maharashtra in a petrochemical complex....