दादासाहेब बालपांडे फार्मसी महाविद्यालयात रक्तदान आणि आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
नागपुर :21 सप्टेंबर 2023 रोजी दादासाहेब बालपांडे कॉलेज ऑफ फार्मसी, बेसा, नागपूर येथे रक्तदान आणि आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. साईनाथ ब्लड बँक आणि इंटिग्रिटी हॉस्पिटल नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थी चमूने या शिबिराचे आयोजन केले होते. महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री. मनोज बालपांडे, प्राचार्य डॉ. उज्वला महाजन आणि फार्मसी डिप्लोमा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन डुमोरे यांच्या पाठिंब्यामुळे सदर कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
ही मोहीम यशस्वी करण्यासाठी शिक्षक सदस्य विशेषत: सचिन मेंढी, कु. कृतिका सावरकर, कु. मानसी बारई, कु. अपूर्वा तिवारी यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. शिबिरात विद्यार्थ्यांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
एकूण ६४ सदस्यांनी रक्तदान केले तर १५० हून अधिक सदस्यांना रक्तातील साखरेची पातळी, रक्तदाब, हिमोग्लोबिन चाचणी, ईसीजी आदी तपासण्या मोफत करण्यात आल्या. तसेच शिबिरात गरजूंना जनरल फिजिशियनकडून मोफत औषधे प्रदान करण्यात आल्या.