*राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचा इशारा*महामोर्चा नंतरही
नागपुर : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात येऊ नये यासह प्रलंबित मागण्याच्या पूर्ततेसाठी राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे नागपूर शहराध्यक्ष पराग वानखेडे यांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिलेला आहे, ओबीसींच्या मागण्यांसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने साखळी उपोषण व धरणे आंदोलन सुरू आहे . महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ बबनरावजी तायवाडे सर यांच्या नेतृत्वात मागील 11 दिवसापासून हे आंदोलन सुरू आहे मराठा समाजाला सरसकट कुणबी सर्टिफिकेट देऊन ओबीसी प्रवर्गात समावेश करण्याची भाषा ही सरकार करत आहे याच्या विरोध म्हणून हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाने जातनिहाय जनगणना करण्यात यावी, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह तत्काळ सुरू करावे, मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण देऊ नये, बिहारच्या धर्तीवर जात निहाय सर्वे करावा यासह बारा मागन्यांसाठी संपूर्ण विदर्भात आंदोलन केले जात आहे, चंद्रपुरात विद्यार्थी जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांच्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाच्या अकरावा दिवस आहे तरी प्रशासन अजूनही चर्चा कुठेही करत नाही आहे , जर रविवार पर्यंत सरकारने चर्चा करून यावर मार्ग काढला नाही तर नागपूर येथील संविधान चौकात नागपूर शहर युवा अध्यक्ष पराग वानखेडे सोबत ओबीसी महासंघाचे जिल्हा अध्यक्ष राजू चौधरी, विद्यार्थी महासंघाचे जिल्हा अध्यक्ष नीलेश कोडे हे सुद्धा अन्नत्यागावर बसेल असा इशारा आज त्यांनी दिला.