*रात्रभराच्या पावसामुळे उडाली प्रशासनाची व अग्निशामक दलाची झोप*
नागपुर : रात्रभर गडगडाहटासह बरसलेल्या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झालेले असून डागा लेआउट परिसरातील नाल्याची भिंत कोसळल्यामुळे तेथील काही भागात सर्वत्र लोकांच्या घरात पाणी साचले असल्याची माहिती मिळताच *महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नागपूर शहर उपाध्यक्ष मा. तुषार भाऊ गिऱ्हे* यांनी डागा लेआउट परिसरात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली व पीडित लोकांची भेट घेतली त्यावेळी *नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त मा. डॉ अभिजीत चौधरी साहेब* देखील प्रत्यक्ष हजर झाले व प्रशासनाला कामी लावले. अग्निशामक दला तर्फे बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
"खरं तर दक्षिण पश्चिम मतदार संघ नागपूर हा मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या विधानसभा क्षेत्रात येत असून देखील या परिसरात ही अवस्था आहे, त्यामुळे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार लोकांना दिसून येत आहे. प्रशासनाला वारंवार तक्रारी देऊन सुद्धा हा सगळा प्रकार घडला जवळपास शंभर ते दोनशे लोक अडकून पडलेले आहेत."असे चेतन बोरकुटे विभाग अध्यक्ष दक्षिण पश्चिम मतदारसंघ नागपूर शहर यांनी प्रसिध्दी पत्रका द्वारे आपले मत मांडले.