चंद्रशेखर बावनकुळे यांचे ट्विट
मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात असलेल्या केंद्रातील भाजपा सरकारने आणलेले महिलांना संसदेत आणि विधानसभेत ३३ टक्के आरक्षण देणारे ‘नारीशक्ती वंदन विधेयक‘ आज लोकसभेत प्रचंड बहुमताने (४५४ मते) पारित करण्यात आले. ही स्वतंत्र भारताच्या इतिहासातील ऐतिहासिक घटना आहे.
महिला सक्षमीकरण हा भारतीय जनता पार्टीसाठी मान्यतेचा मुद्दा आहे, इतरांसारखा राजकीय नव्हे. हा इतिहास भारतीय जनता पार्टीच्या प्रामाणिक प्रयत्न आणि पुढाकाराने घडला आहे, याचा विसर पडता कामा नये. या ऐतिहासिक घटनेसाठी देशाचे लाडके पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रभाई मोदी यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि समस्त माता भगिनींच्या वतीने मोदीजींना कोटी कोटी धन्यवाद.