27 सप्टेंबर पासून संविधान चौक येथे बेमुदत साखळी उपोषण व आंदोलनाचा इशारा
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद यांच्या वतीने आज दि. 26 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय युवा उपाध्यक्ष विनोद मसराम यांच्यावतीने आदिवासी (अनुसूचित जमाती) बांधवांच्या आरक्षण वाचवण्यासाठी पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेला सिनेट सदस्य दिनेश शेराम, आदिवासी एम्प्लॉयी फेडरेशनचे मधुकर उईके आणि माजी आमदार राजू तोडसाम यांनी संबोधित केले. त्यावेळी वेगवेगळ्या मागण्यांसाठी आंदोलनाचा इशारा देण्यात आला. मागण्यांमध्ये प्रामुख्याने
1) आदिवासी समाजाच्या विरोधात जे षडयंत्र चाललंय त्याला कायमचा संपुष्टात आणण्यासाठी आणि अनुसूचित जमाती मध्ये धनगर अथवा कोणत्याही जातीचा समावेश होऊ नये.
2) गोंडवाना सांस्कृतिक संग्रहालय सुराबर्डी येथेच कायम ठेवावे.
3) कंत्राटी भरती रद्द करण्यात यावी. 4) अनुसूचित जमातीच्या युवकांसाठी थेट विशेष पद भरती करण्यात यावी.
या 4 प्रमुख मागण्यांसाठी येत्या 27 सप्टेंबर 2023 पासून संविधान चौक नागपूर येथे बेमुदत साखळी उपोषण व आंदोलनाचा इशारा दिला आहे. असे पत्रकारांना सांगितले.
संयुक्त आदिवासी कृती समिती तर्फे आयोजन करण्यात आले होते. सोबत गोंडवाना गणतंत्र पार्टी, ट्रायबल ऑफिसर्स फोरम, ऑल इंडिया आदिवासी फेडरेशन विदर्भ, ट्रायबल डॉक्टर असोसिएशन, आदिवासी विद्यार्थी संघ विदर्भ, भाजपा आदिवासी आघाडी, महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेस नागपूर, ऑफ्रोट आणि इतर आदिवासी संघटना या आंदोलनात सहभागी होतील असे म्हटले गेले आहे. याप्रसंगी विदर्भ अध्यक्ष संतोष आतराम, गंगाताई टेकाम, दिनेश सीडाम, राजे वीरेंद्र शहा, डॉ.नरेंद्र कोडवते, ललित पवार, गणेश बालवंशी आदी उपस्थित होते.