नागपूर गणेश पेठ बस स्टँड वर निघाला खूप मोठा साप
नागपुर बुधवार दि 27/09/2023. वेळ 06:40 ला सायंकाळी नागपूर गणेश पेठ बस स्टैंड वर सुरक्षा गार्ड चौकी मध्ये गणेश निमजे बसले होते. त्यात त्यांना उंदरांचा आवाज येत होता त्यांनी डोक्याच्या वर बघितले त्यांना आठ फूट लांबीचा काळा साप दिसला ते बघताच त्यांना घाबरुन चौकी च्या बाहेर निघाले सर्वांना एकत्रित आवाज देऊन चौकी मध्ये खूप मोठा साप आहे सर्व सर्व डेपो एस टी महामंडळ कर्मचारी ड्रायवर . चौकी च्या आत बघत होते. साप चौकीच्या भिंतीमध्ये दर असल्या ठिकाणी जाऊन बसला होता. गणेश नीमजे यांनी पोलीस नियंत्रण कक्ष यांना माहिती दिली. पोलिसांनी निसर्गमित्र सर्पमित्र शुभम पराळे यांचा मोबाईल क्रमांक घेऊन तात्काळ यांना संपर्क साधावा सर्पमित्र शुभम यांना संपर्क साधून एसटी महामंडळ गणेश पेठ नागपूर येथे सुरक्षा चौकी गार्ड रूम मध्ये खूप मोठा साप उंदीर खात बसला आहे आपण तात्काळ येऊन सापाला पकडून सोबत घेऊन जा सर्पमित्र शुभम पराळे त्यावेळी रामबाग शर्मा ट्रेडरस येथे सीसीटीव्ही काम करत होते. रामबाग मधून पाच मिनिटात गणेश पेठ बस स्थानकावर पोहोचले सापाचा शोध घेत असल्यास साप भिंतीच्या दरामध्ये जाऊन लपला होता दर फोळून सापाला सुखरूप बाहेर काढले. एस टी महामंडळ येथे बोरी मिळण्यास अर्धा तास लागल्यास सापाला शुभम सर्पमित्र यांनी खूप वेळ हातात पकडून उभे होते.20 मिनिटांनी कंडक्टर यांनी बोरी घेऊन आले सापाला सुखरूप बोरी मध्ये बंदिस्त करून वन विभागीय सेमिनरी हिल्स टी.टी.सी सेंटर .सदर .नागपूर शहर पंचनामा करून यांच्या स्वाधीन केले.