राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नागपूर च्या वतीने गणेश टेकडी येथे गणेश चतुर्थी निमित्त ढोल ताशा पथक तर्फे गणेशाला मानवंदना कार्यक्रम
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नागपूर च्या वतीने गणेश टेकडी येथे गणेश चतुर्थी निमित्त ढोल ताशा पथक तर्फे गणेशाला मानवंदना कार्यक्रम
नागपुर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नागपूर च्या वतीने गणेश टेकडी येथे गणेश चतुर्थी निमित्त ढोल ताशा पथक तर्फे गणेशाला मानवंदना कार्यक्रम सोमवार दिनांक 25.9.2023 रोजी सायंकाळी 5 वाजता आयोजित केला होता. ढोल ताश्याच्या आवाजने परिसर दुमदुमला आणि उत्सवाच्या वातावरणात गणेश भक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. प्रशांत पवार यांच्या हस्ते गणेश मंदिरात आरती करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजक शहर अध्यक्ष प्रशांत पवार यांनी गणराया कडे सर्वांना सुख समृद्धी लाभो व शहरावर आलेलं आसमनी संकटातून सर्वांना बाहेर काढाव अशी प्रार्थना केली.
यावेळी शहर अध्यक्ष प्रशांत पवार, महिला अध्यक्ष लक्ष्मी सावरकर, युवक कार्यकारी अध्यक्ष रवी पराते, विद्यार्थी युवक अध्यक्ष विश्वजित तिवारी, उपाध्यक्ष निलिकेश कोल्हे, जयंत किणकर, राकेश बोरीकर, महासचिव मिलिंद महादेवकर, युवकचे नागेश देडमुठे, राहुल कामळे , भारती गायधने, नंदा चांदपूरकर, ज्योती तिडके, विजयमाला रामटेके, शिल्पा गायधने व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.