व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबई तसेच प्रादेशिक नागपूर तर्फे पदवीदान समारंभाचे, कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये आयोजन
नागपुर :व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबई तसेच प्रादेशिक नागपूर तर्फे पदवीदान समारंभाचे आयोजन दिनांक 17 सप्टेंबर 2023 ला विश्वकर्मा दिवसाचे तसेच मा पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षणार्थ्यांचा पदवीदान समारंभ आयोजित करण्यात आला होता. या समारंभाचे उद्घाटन मा ना श्री देवेंद्रजी फडणवीस मा उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभ हस्ते तसेच मा ना श्री मंगल प्रभात लोढा मा मंत्री कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले तसेच महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र शासन स्वच्छता अभियान संपूर्ण राज्यात दिनांक 17 सप्टेंबर 2023 पासून राबवीत आहे स्वच्छता पंधरवडा म्हणून साजरा करत आहे त्यामुळे स्वच्छता पंधरवड्याचे विधिवत उद्घाटन सुद्धा करण्यात आले या समारंभाला मा श्री मोहनजी मते आमदार दक्षिण नागपूर तसेच प्रवीण जी दटके विधान परिषद सदस्य हे प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमाला मा श्री आशिष कुमार सिंह अतिरिक्त मुख्य सचिव कौशल्य रोजगार व उद्योजकता व नाविन्यता विभाग मा श्री दिगंबर दळवी संचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबई श्री पुरुषोत्तम देवतळे मा सहसंचालक नागपूर विभाग संचालनायातील वरिष्ठ अधिकारी श्री रमन पाटील श्री येते श्री निकम सहसंचालक कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते या पदवीदान समारंभामध्ये एकूण 33 प्रशिक्षणार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली महाराष्ट्र राज्यातून प्रथम तीन आलेले तसेच स्थानिक नागपूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून गुणत्तेनुसार प्रथम तीन आलेल्या प्रशिक्षणार्थ्यांचा माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस तसेच मा ना श्री मंगल प्रभातजी लोढा यांच्या शुभहस्ते प्रशिक्षणार्थ्यांचा सत्कार करण्यात आला प्रशिक्षणार्थ्यांना सन्मानचिन्ह अंतिम प्रमाणपत्र गुणपत्रिका देऊन सन्मान करण्यात आला या समारंभाला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून उत्तीर्ण झालेले प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत असलेले २२०० प्रशिक्षणार्थी उपस्थित होते जेष्ठ नागरिक पालक पत्रकार व सर्व नागपूर जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित होते या संपूर्ण सोहळ्याला मोठ्या प्रमाणात प्रशिक्षणार्थी हजर होते या पदवीदान समारंभाचे विधिवत उद्घाटन मा ना श्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या शुभहस्ते व मा ना श्री मंगल प्रभातजी लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेे.
याप्रसंगी मा संचालक श्री दळवी यांनी प्रास्ताविक मार्गदर्शनपर भाषणात मा संचालकांनी या वर्षभरात विभागाने केलेल्या उल्लेखनीय कामाबाबत माहिती तसेच खात्याने सुरू केलेल्या विविध योजना,अल्पमुदतीचे प्रशिक्षण विद्यावेतनामध्ये केलेली वाढ रोजगाराच्या संधी प्रवेशात वाढ ,भविष्यात राबविण्यात येणाऱ्या विविध योजना प्रशिक्षणार्थ्यांच्या विकासासाठी सुरू केलेले विविध नवीन व्यवसाय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील पायाभूतसुविधे मध्ये केलेली वाढ प्रशिक्षणाचा दर्जा तसेच कौशल्य आपल्या दारी या नवीन उपक्रमाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले व प्रशिक्षणार्थ्यांना पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या मा ना श्री मंगलप्रभात लोढा मंत्री कौशल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभाग यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात प्रशिक्षणार्थ्यांना शुभेच्छा दिल्या मा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी तसेच विश्वकर्मा दिवसाचे औचित्यसाधून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रशिक्षणार्थ्यांसाढी पदवीदान समारंभ आयोजित करण्यात आला व त्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना भविष्याबाबत शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांनी खात्याच्या विविध योजनेबाबत तसेच प्रशिक्षणार्थ्यांच्या विद्या वेतनात केलेल्या ५०० वाढी बाबत तसेच सद्यस्थितीत सुरू असलेल्या विविध अल्पमुदतीचे प्रशिक्षण तसेच विभागातर्फे राबविन्यात येणाऱ्या विविध योजनेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले तसेच भविष्यामध्ये राबविण्यात येणाऱ्या योजनेबाबत मार्गदर्शन केले तसेच आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षणार्थी घडवण्याचा मानस व्यक्त केला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील पायाभूत सुविधाची उभारणी करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणे विकासात्मक कामे करणे व सर्व सोयी सुविधा नवीन तंत्रज्ञाने औद्योगिक प्रशिक्षण संस्था आधुनिक करण्यासाठी व प्रशिक्षणार्थ्यांना पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या रोजगार स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याबाबत प्रशिक्षणार्थ्यांना आश्वासन दिले पदवीदान समारंभाच्या उद्घाटनपर भाषणात मा ना श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सर्व प्रशिक्षणार्थ्यांचा सत्कार केला तसेच सर्व उत्तीर्ण प्रशिक्षण त्यांना पदवीची शपथ दिली प्रशिक्षणार्थ्यांना पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या कौशल्य रोजगार उद्योजक ता व नाविन्यता विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेबाबत त्यांनी प्रशंसा केली विभागामार्फत विविध योजना प्रशिक्षणार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध आहे तसेच त्यांना स्वयंरोजगाराबाबत सक्षम करण्यासाठी विभाग चांगले काम करत आहे तसेच प्रशिक्षणार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर रोजगार उपलब्ध होत आहे याबद्दल माहिती दिली त्यांनी विश्वकर्मा दिनानिमित्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्राचीन काळी आपल्या देशामध्ये बारा बलुतेदार कौशल्य संबंधी व्यवसाय करीत होते त्यासंबंधी व्यवसाय अभ्यासक्रम सुरू करण्याच्या आवाहन केले माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देश प्रगती करत आहे चंद्रयान दक्षिण ध्रुवावर गेलेले आहे तसेच विविध कौशल्याच्या योजना राबविण्यात येत आहे भारताची अर्थव्यवस्था जगात पहिल्या पाच मध्ये पोचलेली आहे देशाने प्रगती केली आहे . औद्योगिक प्रशिक्षण संस्था आंतरराष्ट्रीय स्तराच्या करण्याकरिता आवश्यक मदत करण्याचे आश्वासन दिले उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.