राष्ट्रवादी काँग्रेस हिंगणघाट व्दारा घरघुती गणपति सजावट स्पर्धा आयोजन
🖊️प्रविण जगताप 🖊️वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो . 9284981757
हिंगणघाट : राष्ट्रवादी काँग्रेस हिंगणघाट व्दारा घरघुती गणपति सजावट स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती. या स्पर्धेत हिंगणघाट तालूक्यातील अनेकांनी भाग घेतला. उत्कृष्ट सजावट, वेगवेगळे देखाव्याचे फोटो स्पर्धेकांनी सोशल मीडिया च्या माध्यमातून सादर केले.यास्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मा.श्री.अतूलभाऊ वांदिले यांनी उपस्थित राहुन सर्व स्पर्धकांना बक्षीस वितरण केले.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अमोल बोरकर, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, विधानसभा उपाध्यक्ष प्रशांत लोणकर, विदयार्थी जिल्हा उपाध्यक्ष राहुल जाधव, तालुका सचिव निखिल ठाकरे आदी उपस्थित होते.घरघुती गणपति सजावट स्पर्धेचे आयोजन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रविकिरण कुटे यांनी केले...