हिंगणघाट शहरातील रामनगर,( प्रबुद्ध नगर) मध्ये वर्षावास निमित्त धम्म प्रबोधन कार्यक्रम संपन्न
🖊️प्रविण जगताप 🖊️ वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो . 9284981757
हिंगणघाट :- भारतीय बौद्ध महासभा तालुका व नगर शाखेच्या वतीने रामनगर (प्रबुद्ध नगर )येथील सम्यक बुद्ध विहार, हिंगणघाट. येथे भारतीय बौद्ध महासभेचे ता.उपाअध्यक्ष (ता. पर्यटन प्रमुख) परशुरामजी वाघमारे केंद्रीय शिक्षक यांचे अध्यक्षतेखाली २०२३ वर्षावास प्रबोधन मालिका सत्रातील १७ वे पुष्प शुक्रवार दि.२९/९/२०२४ ला आयु. संजय च. वानखेडे (बौद्धाचार्य) (भा. बौ.महासभा हिं. ता. महासचिव) यांनी "कालामसूत्त (मानव मुक्तीचा जाहीरनामा)"भाद्रपद पौर्णिमा" या विषयावर प्रबोधन करून यावर महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले .या कार्यक्रमाची सुरुवात आमंत्रित पाहुण्यांनी तथागत भगवान बुद्ध व बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्राला पुष्पहार आणि दीप प्रज्वलन करून बुद्धवंदने नंतर धम्म अभियान गीताने या कार्यक्रमाला सुरुवात झाली प्रस्ताविक सुनील जी तेलतुंबडे हिं.शहर सचिव यांनी केले . संचालन आयु.उमरेताई तर आभार तेलंग ताई यांनी केले. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे तालुका व नगर शाखेचे संपूर्ण पदाधिकारी संजय वानखेडे ,अंबादासजी गायकवाड ,रिंगणे सर, अभिमन्यूजी धोटे ,बाळा भाले ,सेवक दास झांबरे, एन.टी.भीमटे सर ,रमेशजी बुरबुरे ,अनिल गायकवाड, निरंजन कांबळे, धर्मदास थूल , चंद्रमणी कांबळे, बुध्दम कांबळे , वासंती देवगडे, तसेच सदस्य आणि वार्डातील शेकडो महिला त्याचप्रकारे उपासक-उपासिका .ई.आवर्जून उपस्थित होते .या कार्यक्रमाच्या शेवटी अल्पोपहार वाटप करून या कार्यक्रमाचा समारोप झाला.