मौलाना आझाद रिसर्च एंड ट्रेनिंग इनस्टिटयुट महाराष्ट्र कृति समिती तर्फे मुखमत्री यांना निवेदन देण्यात आले
दि २१ सप्ते :नागपूर येथे मा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या नावाने विभागीय आयुक्त यांच्या मार्फत मार्टि साठी व प्रत्येक विभागासाठी वेगळे अल्पसंख्याक आयुक्तालय व्हावा व प्रत्येक जिल्ह्यात विभक्त अल्पसंख्याक कार्यलय व्हावा यासाठी अप्पर विभागीय आयुक्त साहेब यांच्याशी सविस्तर चर्चा करून निवेदन देण्यात आले.
प्रमुख मागण्या
१ . इतर समाजाच्या तरुणाच्या विकासासाठी शासनाची स्वयात्त संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर अल्पसंख्याक विशेषत मुस्लिम समाजाच्या विदयार्थ्याच्या शैक्षणिक आर्थिक व सामाजिक विकासासाठी इतर समाजाच्या प्रमाणे विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाची मौलाना आझाव रिसर्च ट्रेनिग इन्सिटिटयुट MARTI या नावाने स्वायत्त संस्थेची स्थापना करण्यात यावे.
२ . अल्पसंख्याक विकास विभागामार्फत राबविण्यात येणा-या केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना अलपसंख्याक समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी अलप्संख्याक आयुक्तालयाची स्थापना करण्यात यावे हि नम्र वनंती.