पत्ता विचारण्याच्या कारणावरून मोटारसायकल स्वार व्यक्तीला थांबवले व दुसऱ्या व्यक्ती ने रू ४,७६,०००/- ची बॅग जबरीने हिसकावली
पत्ता विचारण्याच्या कारणावरून मोटारसायकल स्वार व्यक्तीला थांबवले व दुसऱ्या व्यक्ती ने रू ४,७६,०००/- ची बॅग जबरीने हिसकावली
नागपुर : अविनाश विनोद तांडेकर, वय २६ वर्षे, रा. क्वॉर्टर नं ३७४, कुंभारे कॉलोनी, न्यु कामठी, हे एस अॅन्ड आयबी सर्व्हिस प्राय. लिमिटेड या कंपनीत कॅश पिक-अप करण्याचे काम करतात. अविनाश यांनी नेहमीप्रमाणे सिएनजी गॅसपंप विटाभट्टी चौक, यशोधरानगर व तेथुन सिएनजी गॅसपंप वाडी नाका अमरावती रोड येथून कॅश पिक-अप केली व ती कॅश एकुण ४,७६,०००/- ची एका काळ्या रंगाच्या बॅगमध्ये ठेवुन स्वतःचे स्प्लेंडर प्लस मोटारसायकलने एचडीएफसी बँक, पॉवर ग्रीड चौक, कपीलनगर येथे भरण्याकरीता जात असता, दिनांक २०.०९.२०२३ चे दुपारी १.१५ वा. ते १.३० वा. चे दरम्यान पोलीस ठाणे वाडी हद्दीत एचडीएफसी बँक शाखा, वाडी चे समोर, काही अंतरावर त्यांना रोडवर उभे तिन २५-३० वयोगटातील इसमांनी हात देवुन थांबविले व पत्ता विचारला .अविनाश ला पत्ता विचारला असतां मला माहीत नाही असे सांगीतले. तेवढ्यात अविनाश च्या मागुन एका काळ्या रंगाचे पल्सर मोटारसायकलवरून आलेल्या इसमाने अविनाश जवळील रक्कम असलेली बॅग जबरीने हिसकावुन पळुन गेला. फिर्यादीने पाठलाग केला असता, तो मिळाला नाही. पत्ता विचारणारे तिन इसम सुध्दा तेथुन पळुन गेले होते. आरोपीतांनी संगनमत करून फिर्यादी जवळील ४,७६,००० /- रू. असलेली बॅग जबरीने हिसकावुन नेली.
याप्रकरणी फिर्यादी अविनाश यांनी दिलेल्या तक्रारी वरून पो.ठाणे वाडी येथे पोउपनि नाचन यांनी आरोपीविरूध्द कलम ३९२, ३४ भादवि. अन्वये गुन्हा नोंदवुन आरोपीचा शोध घेत आहे. पुढील तपास सुरू आहे.