डोंगरगाव येथील बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडून २२ लाख लुटले।
हिंगणा (ता २३)रमेश पाटील : पोलीस स्टेशन अंतर्गत वर्धा मार्गालगत डोंगरगाव येथील बॅँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडून त्यातील २२ लाख रुपये अज्ञात आरोपीनी घेऊन गेले.ही घटना शुक्रवारी मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास घडली. याच आरोपीनी नंतर बुटीबोरी येथील सुद्धा एक एटीएम फोडल्याची माहिती आहे. वर्धा मार्गावरून गुमगाव कडे जाणाऱ्या मार्गावर बँक ऑफ इंडियाचे एटीएम आहे शुक्रवारी रात्री दोनतीन अज्ञात आरोपीनी आधी येथील सीसीटीव्ही कॅमेराला काळा पदार्थ लावून ते बंद करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर एटीएम फोडून त्यातील सुमारे २२ लाख रुपये रोख घेऊन पसार झाले. हिंगणा पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील काही सीसीटीव्ही सुद्धा तपासण्यात आले या एटीएम मधून नेमकी किती रक्कम होती हे तपासण्या करिता बँकेच्या अधिकाऱ्यांना उशीर लागला त्यामुळे आज रात्री गुन्हा नोंद करण्यात आला. डोंगरगाव येथे याआधीही एटीएम फोडण्यात आले होते. तरीही या ठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात नसल्याची माहिती समोर आली आहे