श्री.बि.व्यंकटेश प्रकाशराव याची बेल्लोरी ते बागेश्वर धाम हनुमान मंदिर छत्तरपुर मध्यप्रदेश पर्यंत अध्यात्मीक सायकल यात्रा
श्री.बि.व्यंकटेश प्रकाशराव याची बेल्लोरी ते बागेश्वर धाम हनुमान मंदिर छत्तरपुर मध्यप्रदेश पर्यंत अध्यात्मीक सायकल यात्रा
नागपुर वाडी येथील एक धाडसी युवा श्री.बि.व्यंकटेश प्रकाशराव यांनी भक्ती व शक्ती मनात घेवुन बेल्लोरी ते मध्यप्रदेश अशी ६०० किलोमिटरची "आध्यात्मिक संकल्प यात्रा" सायकल व्दारा पुर्ण करण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे.
शनिवार दि.३० सप्टेंबर २३ रोजी बेल्लोरी त.सावनेर नागपुर येथील प्राचीन मंदिर श्री.संकटमोचन पंचमुखी हनुमान मंदिर येथुन सायकल यात्रा सकाळी ७.०० वाजता सुरु होणार असुन ती बागेश्वर धाम बालाजी हनुमान मंदिर छतरपुर मध्यप्रदेश येथे तिस-या दिवशी संध्याकाळी पोहचेल.
या सर्व व्यवस्थेचे आयोजन चेतन कोलते व भक्त मंडळीने केले आहे.श्री.राव हे दरवर्षी देशातील प्रसिध्द धार्मीक स्थळी सायकलने यात्रा करतात व आपल्या प्रवासात ते नागरीकांना बंधुत्व,प्रेम,धर्म व धार्मीक परंपरा यांबद्दल शिकवण देतात.
मागील वर्षी त्यांनी नागपुर ते तिरुपती हा १३५० किलोमीटरचा प्रवास सायकल यात्रे व्दारे पुर्ण केला होतायाप्रसंगी या विभागातील मान्यवर उपस्थीत राहणार आहेत भक्त मंडळीने मोठ्या संख्येने उपस्थीत राहावे अशी विनंती आयोजकातर्फे करण्यात आली.