सलीलदादा अ. देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्ताने अनाथ मुला-मुलींना शिक्षण साहित्य सामग्री भेट
नागपूर : राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष ओ बी सी सेल चे नागपुर जिल्हा अध्यक्ष रुपेश बांगडे यांच्या वतीने रा.कॉं.पा पक्षाचे युवा नेते व् काटोल -नरखेड क्षेत्रातील जिल्हा परिषद सदस्य सलीलदादा अनिलजी देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त समता अनाथ विद्यार्थी गृह याठिकाणी अनाथ मुले व मूली यांच्या सोबत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला व त्यानंतर सर्व मुलांना शिक्षण साहित्य सामग्री व फल वितरण करण्यात आले .
याप्रसंगी ओ बी सी सेल चे जिल्हा अध्यक्ष रुपेशजी बांगडे, शहर महासचिव नत्थूजी दरोटे, उत्तर नागपुर अध्यक्ष सुनील लांजेवार, सूफी टाइगर, obc सेल कार्याध्यक्ष पूर्व नागपुर पिंटूजी आग्रे, कमलेश वराडे, रोहितजी चोपकर, शंकर बनारसे, हर्षल खडतकर, प्रफुल्ल दारोटे समस्त पदाधिकारी उपस्थित होते.