*शिक्षणासोबत संविधानिक मूल्य जपणे उज्वल भविष्यासाठी आवश्यक:* *एडुसन फाउंडेशन*
नागपूर: नवीन सुभेदार येथील एडुसन फाउंडेशन च्यावतीने २६ नोव्हेंबर रोजी, संविधान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी हुडकेश्वर पोलिस स्टेशन येथील API सचिन तायवाडे मुख्य अतिथी व वक्ता आणि संस्थेचे सदस्य उमेश ठाकरे उपस्थित होते. सुरुवातीला भारतीय संविधानाचे जनक डॉ.भीमराव आंबेडकर यांच्या प्रतिमेला मुख्य अतिथीद्वारे माल्यार्पण करण्यात आले आणि त्यानंतर २६ नोव्हेंबर २००८ ला मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. उपस्थित सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी सामूहिक शपथ घेतली. उपस्थित मुख्य अतिथीनीं संविधान दिनाच्या प्रसंगी शिक्षणा सोबत संविधानिक मूल्य जपणे उज्वल भविषयासाठी किती गरजेचे आहे व सामाजिक जाणीव ठेऊन पुढे मार्गक्रमण करत राहण्याचा सल्ला मुलांना दिला. मौलिक अधिकारासोबत कर्तव्याची जाणीव ठेवावी असाही संदेश देण्यात आला. संस्थेचे संचालक निलेश काळे यांनी मुलांना संविधान दिनानिमित्त यशस्वी वाटचाली करिता प्रोत्साहित केले व शुभेच्छा दिल्या. सहसंचालक सरोज काळे यांनी आभार मानले.