नागपूर महानगरपालिका नागपूर प्रवर्तन विभाग व्दारा केलेली कारवाई
• म न पा प्रवर्तन विभाग मार्फत आज दि. ०३/११/२०२३ रोजी गांधीबाग झोन क. ६ झोन कार्यालय ते महाल चौक ते बडकस चौक ते चिटणीस पार्क ते शिवाजी पुतला रोड ते महाल चौक ते डागा हॉस्पिटल पर्यंत अतिक्रमणाची कार्यवाही करण्यात आली ज्या मध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजू वरील रोड व फुटपाथवर अवैध पध्दतीने लावण्यात आलेले ठेले व दुकान हटविण्यात आले.असे अंदाजे ०१ ट्रक साहित्य जप्त करण्यात आले व परीसर मोकळा करण्यात आला.
• धंतोली झोन क्र. ०४ अंतर्गत श्रीमती वंदना भाऊराव कोकणे आर्शिवाद टॉकीज समोर बैद्यनाथ चौक, नागपूर. येथील अनधिकृत पद्धतीने बांधकाम केलेले असून त्यांना महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम 1966 चे कलम 53 (1) अंतर्गत दि.28.07.2021 रोजी झोन द्वारा नोटीस तामिळ करण्यात आलेले होते. तर आज अतिक्रमण विभागाद्वारे यांच्या अनधिकृतपणे बांधण्यात आलेले बांधकामावर कारवाई करण्यात आली ज्यामध्ये यांचे पूर्णपणे 135.24 चौ. मि एकूण अनधिकृत घराचा बांधकाम पूर्णपणे तोडण्यात आले व परिसर मोकळा करण्यात आला. या नंतर झोन कार्यालय ते मेडिकल चौक ते तुकडोजी पुतला चौक पर्यंत अतिक्रमणाची कार्यवाही करण्यात आली ज्या मध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजू वरील रोड व फुटपाथवर अवैध पध्दतीने लावण्यात आलेले ठेले व दुकान हटविण्यात आले. असे अंदाजे 01 ट्रक साहित्य जप्त करण्यात आले.व परीसर मोकळा करण्यात आला.
• आसीनगर झोन क्र .०९ अंतर्गत झोन कार्यालय ते कमाल चौक ते इंदोरा चौक ते रिपब्लिकन चौक ते नारी रोड बस स्टॉप पर्यंत अतिक्रमणाची कार्यवाही करण्यात आली ज्या मध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजू वरील रोड व फुटपाथवर अवैध पध्दतीने लावण्यात आलेले ठेले व दुकान हटविण्यात आले आणि परीसर मोकळा करण्यात आला.
• धरमपेठ झोन क्र .०२ अंतर्गत झोन कार्यालय ते व्हरायटी चौक पर्यंत अतिक्रमणाची कार्यवाही करण्यात आली ज्या मध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजू वरील रोड व फुटपाथवर अवैध पध्दतीने लावण्यात आलेले ठेले व दुकान हटविण्यात आले . असे अंदाजे 03 ठेले जप्त करण्यात आले व परीसर मोकळा करण्यात आला.
• ही कारवाई श्री. हरीष राऊत सहा. आयुक्त, अतिक्रमण विभाग व संजय कांबळे प्रवर्तन अधिक्षक यांचे मार्गदर्शनात भास्कर माळवे, क. अभियंता व अतिक्रमण पथकाव्दारे करण्यात आले..