सीधे मुख्य सामग्री पर जाएं

अक्षरा सिंहने दिला रविवारी भोजपुरी तडका खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवाचा तिस-या दिवशी नागपूरकर थिरकले

 


अक्षरा सिंहने दिला रविवारी भोजपुरी तडका 

खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवाचा तिस-या दिवशी नागपूरकर थिरकले

नागपूर, 26 नोव्‍हेंबर 

रुपेरी पडद्यावर आपल्‍या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावणा-या आणि सुरेल आवाजाने मंत्रमुग्‍ध करणा-या अक्षरा सिंहने रविवारी खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवाला भोजपुरी तडका दिला. अक्षराच्‍या गाण्‍यावर नागपूरकर चांगलेच थिरकले. पटांगणावर एकच माहोल झाला. 

ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्‍या खासदार सांस्‍क‍ृतिक महोत्‍सवाचा आज तिसरा दिवस होता. भोजपुरी चित्रपटसृष्‍टीतील आकर्षक व्‍यक्तिमत्‍व असलेली अष्‍टपैलू अभिनेत्री व गायिका अक्षरा सिंग यांची रविवारी ‘लाईव्‍ह इन कॉन्‍सर्ट’ पार पडली. कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पोलिस आयुक्‍त अम‍ितेश कुमार, निको ग्रुपचे संचालक रमेश जयस्‍वाल, मेट्रोचे सीएमडी श्रावण हर्डीकर, व्‍हीआयएचे अध्‍यक्ष प्रशांत मोहता, एनआयटीचे चेअरमन मनोज सुर्यवंशी, उद्योगपती अशोक गायल, भाजपाचे नागपूर जिल्‍हा अध्‍यक्ष माजी आ. सुधाकर कोहळे, रेल्‍वेचे डीआरएम पांडे, नंदकुमार सारडा यांची उपस्‍थ‍िती होती. दीपप्रज्‍वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. 

‘मै हवा हुं तेरे दिल में उतर जाऊंगी’ असे म्‍हणत अक्षरा सिंगने मंचावर प्रवेश केला. प्रत्‍येकाच्‍या जीवनात मातेला अढळ स्‍थान राहिले आहे, असे म्‍हणत अक्षरा सिंग यांनी ‘सारी दुनिया का हात, मेरे सरसे हटे, मां तू अपना हटाना ना’ हे भोजपुरी गीत सर्व मातांना समर्पित केले. त्‍यानंतर अक्षराने ‘नागपूर गरदा उडावत चाली’ हे गाणे व नृत्‍यावर गरदा उडवला. नायिका म्‍हणून करीअरला सुरुवात केली पण गाणे म्‍हणत येत नव्‍हते. रसिकांच्‍या प्रेमापोटी गायला सुरुवात केली असे म्‍हणत अक्षराने ‘मेरे रश्‍के कमर तुने पहली नजर’ या गीतावर ठुमके लगावले. ‘हाल क्‍या है, दिलों का ना पुछो सनम’, ‘इश्‍क और प्‍यार का मजा लिजिए’ सारखी अनेक जोशपूर्ण गाणाी सादर करीत रसिकांचा थिरकायला भाग पाडले. मुंबईचा युवा गायक कुणाल पंडितने अक्षराला उत्‍तम साथ दिली. सोबतच, मेरी रुह का परिंदा, धीम धीम ताना, हम्‍मा हम्‍मा आदी गीते सादर केली. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका देशकर व बाळ कुलकर्णी यांनी केले. महोत्‍सवाच्‍या यशस्‍वीतेसाठी खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव आयोजन समितीचे अध्‍यक्ष प्रा. अनिल सोले, उपाध्यक्ष प्रा. मधूप पांडे, डॉ. गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्‍ता, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, सदस्य बाळासाहेब कुलकर्णी, हाजी अब्‍दुल कदीर, सारंग गडकरी, अविनाश घुशे, संदीप गवई, संजय गुळकरी, रेणुका देशकर,गुड्डू त्रिवेदी, किशोर पाटील, चेतन कायरकर, आशिष वांदिले, भोलानाथ सहारे, अॅड. नितीन तेलगोटे, मनिषा काशीकर यांचे सहकार्य लाभत आहे. 

.......

संविधान प्रास्‍ताविकेचे वाचन 

भारतीय संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या नेतृत्‍वाखाली भारतीय संविधानाच्‍या निर्मितीसाठीचा मसुद्याला 26 नोव्‍हेंबर रोजी अंतिम स्‍वरूप देण्‍यात आले होते. तो दिवस ‘राष्‍ट्रीय संविधान दिन’ म्‍हणून साजरा केला जातो. त्‍यानिम‍ित्‍त संविधान प्रास्‍ताविकेचे वाचन अविनाश घुशे यांनी केले. नितीन गडकरी व इतर मान्‍यवरांसह पटांगणावर मोठ्या संख्‍येने उपस्‍थ‍ितीत नागपूरकरांनी त्‍यात सहभाग घेतला.

........

नृत्‍याविष्‍कारातून सादर झाली नदीची जन्‍मकथा

उदयोन्‍मुख कलाकारांना प्रोत्‍साहन देण्‍याच्‍या उद्देशाने रविवारपासून स्‍थानिक कलाकारांचे विविध कार्यक्रम सादर केले जाणार असून त्‍या श्रृंखलेतील पहिला कार्यक्रम रविवारी मुख्‍य कार्यक्रमापूर्वी पार पडला. स्‍वरसंगम प्रस्‍तुत किशोर नृत्‍य निकेतनतर्फे प्रसिद्ध भरतनाट्यम गुरू क‍िशोर व किशोरी हम्‍पीहोळी यांच्‍या चमूने ‘गंगा-यमुना’ ही नृत्‍यनाटिका सादर केली. गंगा, यमुना आणि सरस्‍वती या तीन प्रमुख नद्यांच्‍या त्रिवेणी संगमावर आधारित या नृत्‍यनाटिकेतून नदीच्‍या जन्‍माची कहाणी, जलप्रदूषण व कोरोना काळात लागलेल्‍या लॉकडाऊनमध्‍ये नद्यांची झालेली स्‍वच्‍छता यावर भाष्‍य करणारी कहाणी भरतनाट्यम नृत्‍यनाटिकेच्‍या माध्‍यमातून प्रस्‍तुत करण्‍यात आली. यात ऐश्‍वर्या मोघे, प्राची बारापात्रे, श्रेया जोशी, काजल खिची, कोमल म्हैसबडवे, आधा मोहुर्ले, इंद्रायणी इंदूरकर, कल्‍याणी चिकुलवार, सपना पटेल, भूम‍िका मेंडुले, रुपल मंदावार, रिद्धी इंगे, गौरी भागवत, प्रणाली रसाळ, पृथा राऊत, जान्‍हवी बेतावार, गुढी मोहुर्ले, कामाक्षी हम्पीहोळी व किशोरी हम्‍पीहोळी या कलाकारांचा सहभाग होता. कार्यक्रमाच्‍या यशस्‍वीतेसाठी लालजी श्रीवास, मुकुंद श्रीवास, नकुल श्रीवास, विशाल यादव व अंकिता देशकर-विश्‍वरुपे यांचे सहकार्य लाभले. कांचनताई गडकरी व अपर्णा अम‍ितेश कुमार यांच्‍या हस्‍ते कलाकारांचा सत्‍कार करण्‍यात आला. 


आज महोत्‍सवात ...

सकाळी 6.30 वाजता : श्री रुद्र पठण

सायं. 6.00 वाजता : 27 नोव्‍हेंबर : विशाल शेळके यांचा बॉलिवूड गीतांचा कार्यक्रम

सायं. 6.30 वाजता : संत तुकडोजी महाराजांच्या जीवनावर आधारीत महानाट्य 'क्रांतीनायक'

……..

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक

 🖊️प्रविण जगताप 🖊️वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो . 9284981757 वर्धा *आज दिनांक ०२ /१० /२०२३ रोजी वर्धा येथे महात्मा लॉन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे जिल्हाध्यक्ष मा श्री सुनीलभाऊ राऊत साहेब यांच्या निर्देशाखाली ही' सभा घेण्यात आली वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक घेण्यासाठी संसदरत्न, कार्यकारी अध्यक्ष, खासदार सौ सुप्रियाताई सुळे , माजी गृहमंत्री मा श्री अनिलभाऊ देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश महिला प्रदेशाध्यक्ष सौ रोहिनिताई खडसे , राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा श्री महेबूबभाई शेख या सर्व दिग्गज नेत्यां च्या नेतृत्वात खाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक घेण्यात आली वर्धा जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते बैठकीनंतर काही युवक व तरुण मुलांचे पक्ष प्रवेश घेण्यात आले हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मा श्री सुधीर बाबूजी कोठारी, माजी आमदार मा श्री राजूभाऊ तिमांडे , प्रदेश सरचिटणीस मा श्री अतुल भाऊ वांदिले , वर्धा जिल्हा अध्यक्ष मा श्री सुनीलभाऊ राऊत, मा श्री समीर भाऊ देशमुख, वर्धा जिल्हा राष्ट्रवादी यु...

बुद्ध विहार येथे बौद्ध भिक्खूंसाठी पोषण जागृती मालिकेचे चौथे सत्र संपन्न

  *बुद्ध विहार येथे बौद्ध भिक्खूंसाठी पोषण जागृती मालिकेचे चौथे सत्र संपन्न*  *निकिता पाटील, प्रख्यात आहारतज्ञ * बौद्ध भिक्खूंसाठी आहार शिक्षण सत्रांची मालिका सुरू ठेवत, मिठास केअरच्या सहकार्याने न्यूट्रा पॉवरने 8 ऑक्टोबर रोजी बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर बौद्ध सेमिनरी, उंटखाना बुद्ध विहार, नागपूर येथे आपले चौथे सत्र आयोजित केले होते. मिठास केअरचे संस्थापक विवेक नगरारे यांनी भिक्षु संघ आहार शिक्षण सत्र अभियानाच्या दूरदृष्टीची माहिती देऊन सत्राची सुरुवात केली. या अभियाना चे पहले सत्र 22 एप्रिल रोजी मैत्री बुद्ध विहार, नारी रोड, नागपूर येथून झाली आणि ह्याचे उद्दिष्ट 1000 हून अधिक बौद्ध भिक्खूंना आरोग्य व पोषण जागृती चे सशक्ति प्रदान करणे आहे ज्यासाठी कदाचित शहरभरातील 100 बुद्ध विहारांमध्ये प्रवास करण्याची आवश्यकता असू शकते. डॉ.आंबेडकर सेमिनरीचे मुख्य धम्म प्रशिक्षक भदंत धम्मसारथी यांनी संपूर्ण समुह ला त्यांच्या मिशनचा सक्रिय भाग बनवण्याची आणि समाजात पोषण शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी नागपूरच्या विविध बुद्ध विहारांमध्ये जास्तीत जास्त भिक्षूंपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांची बांधिलकी द...

10 हजार से ज्यादा भक्तों ने लिया महाप्रसाद का लाभ -विदर्भ के 11 जिलों से आये भक्तों द्वारा रोग निदान,नेत्र जांच ,रक्तदान शिबिर में लिया लाभ

 10 हजार से ज्यादा भक्तों ने लिया महाप्रसाद का लाभ -विदर्भ के 11 जिलों से आये भक्तों द्वारा रोग निदान,नेत्र जांच ,रक्तदान शिबिर में लिया लाभ नागपुर. ((आनन्दमनोहर जोशी) श्राद्ध पक्ष के दौरान सोमवार की चतुर्थी को संकष्टी चतुर्थी से चतुर्दशी तक उत्सव मनाया जा रहा है.वहीँ महल स्थित सीनियर भोसला पैलेस महल में महाराजा ऑफ नागपुर ट्रस्ट के तत्वावधान मे 236 वें वार्षिकोत्सव पर मस्करया श्रीगणेश की विधिवत पूजा रोजाना शाम को राजपुरोहित राजेंद्र पुराणिक के हस्ते मंत्रोच्चारण किया जा रहा है.सरकारी मेडिकल कॉलेज डॉक्टर की टीम ने सफलतापूर्वक प्रयास किया. यहाँ इस दौरान विदर्भ के 11 जिलों से आये भक्तगणों ने स्वास्थ्य शिबिर का लाभ लिया. महाप्रसाद के दौरान अन्न का थालियाँ में उचित मात्रा में प्रसाद के रूप में लेकर जूठा नहीं छोड़ने के लिए सारंग,गणेश गरुड़ और कार्यकर्ताओं द्वारा उद्धोषणा करके निवेदन किये गए.इस विशेष अवसर पर श्रीमंत डॉ. राजे मुधोजी महाराज भोंसले, श्रीमंत रानी यशोधराराजे, श्रीमंत राजे रघुजी भोंसले, श्रीमंत राजे युवराज जयसिंहराव भोंसले,क़ानूनी सलाहकार अधिवक्ता प्रदीप देशमुख, हप्पेनिंग टुडे क...