श्रीक्षेत्र महाकाली धामतिर्थ येथे कार्तिक पौर्णीमा निमित्य महापूजा
श्रीक्षेत्र महाकाली धामतीर्थ येथे कार्तिक पौर्णिमा निमित्य महापूजा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी उत्तर काशी येथे खाणी मध्ये अडकलेल्या 41 कामगारांची सुखरूप मुक्तता व्हावी याकरिता त्रिदेविंना प्रार्थना करण्यात आली.
कार्तिकी पर्णिमेचे महात्म्य विशद करताना पंडित शंकरप्रसादजी अग्निहोत्री म्हणाले की,भारतीय संस्कृती नुसार कार्तिक महिना हा धार्मिक दृष्ट्या खूप महत्वाचा आणि देवांचा मानला जातो . ह्या महिन्यात देवांची पूजा – आराधना आणि त्याच बरोबर उपवास देखील केला जातो. असे मानले जाते कि ह्या महिन्यात देव पृथ्वीवर दिवाळी साजरी करण्यासाठी येतात . म्हणून ह्या कार्तिक पूर्णिमेला आणि देव दिवाळीला खूप महत्व दिले जाते .
कृतीका नक्षत्रात चंद्र आणि विशाखा नक्षत्रात जेव्हा सूर्य असतो तेव्हा असा पवित्र योग घडून येतो.याच दिवशी भगवंतांनी मत्स्य अवतार धारण केला होता. याच दिवशी गुरुनानक जयंती चा सुवर्ण योग जुळवून येतो व याच दिवसात व्यक्तीमध्ये सकारात्मक स्वभाव व विचार निर्माण होतात आणि नकारात्मक विचारांचा नाश होतो. याच सकारात्मक स्वभावातुन संस्कार घडतात, संस्कारातून अवतीभोवती संसाररुपी वलय तयार होते आणि यातूनच सकारात्मकता निर्माण होते व सुखी समाधानी जीवन जगण्याचा मार्ग सापडतो व या मधूनच श्रद्धा,विश्वास, निष्ठा, आस्था व समर्पण यांची निर्मिती होऊन मानवी जीवनाचे कल्याण होते.
यावेळी बाबुलालजी दिग्रसे यांच्या वतीने महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.
यावेळी सौ शिवकुमारिजी अग्निहोत्री, सुरेशजी नायर,सौ नायर,बाबाराव महाजन,चंद्रभान आसोले,अभिजित रघुवंशी, राघोबाजी कोरडे, अनिल बोडखे, गणेश काळे तसेच असंख्य माई भक्त उपस्थित होते.