*प्राण घातक शस्त्रासह दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या आरोपींना अटक.*
प्रतिनिधी, *अनिल के. बालपांडे*, नागपूर.
दिनांक 06 नोव्हेंबर 2023 चे रात्री 11.15 ते 00.45 वाजता दरम्यान गस्तीवर असलेल्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक 3 च्या पथकातील *प्रवीण लांडे* तसेच त्यांच्या टीम ने मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार पोलीस स्टेशन लकडगंज हद्दीत येत असलेल्या म्याको सेरामीक एलटीडी च्या भिंती लगत असलेल्या झुडपा मध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना आरोपी
1) शेख शादाब शेख हारून, वय 22 वर्ष, राजीव गांधी नगर, यशोधरा नगर, नागपूर
2) रीतीक राजकुमार गौर, वय 23 वर्ष, बजेरिया वस्ती, गणेश पेठ, नागपूर
3) मोहम्मद सुलतान मोहम्मद इरफान अन्सारी, वय 25 वर्ष , आयेशा मज्जित मागे, यशोदा नगर, नागपूर.
यांना ताब्यात घेतले असता त्यांच्या जवळून एक लोखंडी चाकू, टॉर्च, दोरी, मिरची पावडर असा एकूण अंदाजे 670/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींना मुद्देमालासह लकडगंज पोलिसांच्या ताब्यात दिल्या गेले आहे. दोन आरोपीकरण प्रकाश जाधव, वय 25 वर्ष, कावरा पेठ, शांतीनगर, नागपूर तसेच रवी श्रावण कैकाडे, वय 38 वर्ष, गरोबा मैदान, लकडगंज ,नागपूरही दोघे अंधाराचा फायदा घेऊन पळून गेलेत.याप्रकरणी *पोलीस उपनिरीक्षक, पंकज गुप्ता,* पोलीस स्टेशन लकडगंज, नागपूर यांनी आरोपी विरुद्ध कलम 399, 402 भा. द. वि. सहकलम4/25भा.ह .का.सहकलम 135 म. पो. का. अन्वये गुन्हा दाखल करून तीन आरोपींना अटक केली आहे. फरार आरोपींच्या शोधात पुढील तपास सुरू आहे.