श्रीहरी नगरात मानेवाडा येथे पूर्ण ब्रम्ह अभियान
नागपूर : आज रविवार दिनांक ५ नोव्हेंबर २०२३ रोजी, श्रीहरी नगरत पूर्ण ब्रम्ह अभियान नुकतेच राबविण्यात आले. गरिब गरजु दुखी, निराधार, जेष्ठ नागरीकांसाठी घरोघरी जाऊन धान्य, गहू, तांदूळ, दाळी, तेल गोळा करून सर्व साहित्य डॉ. राजू मिश्रा सचिव व डॉ. दीपक शेंडेकर जेष्ठ नागरिक प्रतिष्ठान यांना सुदुर्प केले. अभियान यशस्वी करण्यासाठी श्रीहरी नगरातील जेष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष सुरेश उरकुडे तसेच खालील पदाधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सर्वश्री डॉ. अशोक मंदे, रामेश्वर भुते, रामदास कोल्हे, विठ्ठलराव घोडे, केशवराव बोपूलकर, शिवराम गुरनुले, रविंद्र नखाते, गणेश भारद्वाज, जानराव बारई, नामदेव खाटके, जि.बी.उमरकर, अक्षय लांजेवार, छोटू जगनाडे, ऋग्वेद उरकुडे इत्यादी नागरिकांनी सहकार्य केले.