हिंगणघाट शहरात वाढती गुन्हेगारी, दिवसाढवळ्या कुख्यात गुन्हेगाराच्या हत्या
🖊️प्रविण जगताप 🖊️वर्धा जिल्हा प्रतिनिधी मोबाईल :- 9284981757
वर्धा :- हिंगणघाट येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. किसान जिन गंगा माता मदीर जवळ एका कुख्यात गुन्हेगाराच्या हत्याने संपूर्ण हिंगणघाट शहर हादरले आहे. गज्या हांडी नामक असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. हिंगणघाट शहरात दिवसा ढवळ्या झालेल्या या हत्येने शास्त्री वॉर्ड परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हत्या करण्यात आलेल्या इसम हा गजू हंडी हा गुन्हेगारी पार्श्वभूमी असून त्याच्यावर हिंगणघाट पोलीस स्टेशन मध्ये अवैध दारू विक्री, मारामारी, दहशत माजवणे सह विविध गुन्हे दाखल होते. त्याला पोलिसांनी काही दिवस तडीपार पण केलं होत.
गजू हंडी याची धारधार शस्त्राने डोक्यावर वार करून हत्या केल्या नंतर आरोपी घटना स्थळवरून पसार झाले. यावेळी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात रक्त पसरलेले होत. त्याची माहिती स्थानिक हिंगणघाट पोलीस स्टेशनला माहिती मिळताच पोलीस निरीक्षक आपल्या ताप्यासह घटनास्थळी दाखल झाले आणि मृतक गजु हंडी याला स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात हिंगणघाट येथे पाठवले. यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर सपासप वार केले. यामुळे त्याचा जागेवरच मृत्यू झाला. हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरुन फरार झाले. मात्र गजु हंडी याची हत्या नेमकी कोणत्या कारणावरुन करण्यात हे अनभिज्ञ आहे. याप्रकरणी हिंगणघाट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून आरोपींचाही शोध घेत आहेत. दिवसाढवळ्या झालेल्या हत्येमुळे शहरात पुन्हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.