सीधे मुख्य सामग्री पर जाएं

मतदार यादी वाचन विशेष ग्रामसभेस जिल्हाधिकाऱ्यांचा सहभाग


 मतदार यादी वाचन विशेष ग्रामसभेस जिल्हाधिकाऱ्यांचा सहभाग

*520 ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभा*

*विशेष शिबिरात 3 हजार 595 अर्ज दाखल*

*दि.25 व 26 नोव्हेंबरला पुन्हा विशेष शिबिर*


🖊️प्रविण जगताप 🖊️वर्धा जिल्हा प्रतिनिधी मोबाईल :- 9284981757

वर्धा, दि.7 : नवमतदारांनी मतदार यादीत नाव नोंदणी करुन आगामी काळात होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाच्यावतीने विशेष शिबिर घेतले जात आहे. या शिबिराच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवून मतदार नोंदणी वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यात विशेष ग्रामसभांचे देखील आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी एका गावात या सभेला उपस्थित राहून मतदार नोंदणीसाठी प्रोत्साहन दिले.  

मतदार यादीचा संक्षिप्त पुनरीक्षन कार्यक्रम जिल्हाभर राबविण्यात येत आहे. त्यासाठी मतदार प्रारुप यादी प्रसिध्द करण्यात आली असून या प्रारुप मतदार यादीतील आवश्यक दुरुस्ती व नवमतदार नोंदणी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व 520 ग्रामपंचायतींमध्ये दिनांक 1 ते 7 नोव्हेंबर या कालावधीत विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. ग्रामसभेमध्ये नागरिकांच्या माहितीसाठी प्रारुप मतदार यादीचे वाचन करण्यात आले. वर्धा तालुक्यातील सिंदी (मेघे) येथील विशेष ग्रामसभेस जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी स्वत: उपस्थित राहून सहभाग नोंदविला.   

जिल्हाभर दिनांक 4 व 5 नोव्हेंबर रोजी मतदान केंद्रस्तरावर विशेष शिबिर घेण्यात आले. या शिबिरांमध्ये आर्वी विधानसभा मतदारसंघात 649, देवळी विधानसभा मतदारसंघातील 724, हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातील 911 तर वर्धा विधानसभा मतदारसंघातील 950 नागरिकांनी मतदार नोंदणी, दुरुस्ती, नाव व पत्ता बदल, वगळणी आधार जोडणीसाठी विविध नमुने भरून अर्ज सादर केले. जिल्हाभर झालेल्या या विशेष ग्रामसभेस नवमतदारांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढील टप्प्यात दिनांक 25 व 26 नोव्हेंबर रोजी मतदान केंद्रस्तरावर विशेष शिबिर घेण्यात येणार आहे. या ठिकाणी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदार यादीसह उपस्थित राहणार आहे. मतदारांनी आपल्या नावाच्या नोंदणीसह नावे तपासणे, वगळणे, दुरुस्ती करणे, आधार जोडणीसाठी केंद्रावर उपस्थित रहावे. मतदार याद्या अधिक अद्यावत करण्यासोबतच जास्तीत जास्त मतदार नोंदणी करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक

 🖊️प्रविण जगताप 🖊️वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो . 9284981757 वर्धा *आज दिनांक ०२ /१० /२०२३ रोजी वर्धा येथे महात्मा लॉन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे जिल्हाध्यक्ष मा श्री सुनीलभाऊ राऊत साहेब यांच्या निर्देशाखाली ही' सभा घेण्यात आली वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक घेण्यासाठी संसदरत्न, कार्यकारी अध्यक्ष, खासदार सौ सुप्रियाताई सुळे , माजी गृहमंत्री मा श्री अनिलभाऊ देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश महिला प्रदेशाध्यक्ष सौ रोहिनिताई खडसे , राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा श्री महेबूबभाई शेख या सर्व दिग्गज नेत्यां च्या नेतृत्वात खाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक घेण्यात आली वर्धा जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते बैठकीनंतर काही युवक व तरुण मुलांचे पक्ष प्रवेश घेण्यात आले हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मा श्री सुधीर बाबूजी कोठारी, माजी आमदार मा श्री राजूभाऊ तिमांडे , प्रदेश सरचिटणीस मा श्री अतुल भाऊ वांदिले , वर्धा जिल्हा अध्यक्ष मा श्री सुनीलभाऊ राऊत, मा श्री समीर भाऊ देशमुख, वर्धा जिल्हा राष्ट्रवादी यु...

बुद्ध विहार येथे बौद्ध भिक्खूंसाठी पोषण जागृती मालिकेचे चौथे सत्र संपन्न

  *बुद्ध विहार येथे बौद्ध भिक्खूंसाठी पोषण जागृती मालिकेचे चौथे सत्र संपन्न*  *निकिता पाटील, प्रख्यात आहारतज्ञ * बौद्ध भिक्खूंसाठी आहार शिक्षण सत्रांची मालिका सुरू ठेवत, मिठास केअरच्या सहकार्याने न्यूट्रा पॉवरने 8 ऑक्टोबर रोजी बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर बौद्ध सेमिनरी, उंटखाना बुद्ध विहार, नागपूर येथे आपले चौथे सत्र आयोजित केले होते. मिठास केअरचे संस्थापक विवेक नगरारे यांनी भिक्षु संघ आहार शिक्षण सत्र अभियानाच्या दूरदृष्टीची माहिती देऊन सत्राची सुरुवात केली. या अभियाना चे पहले सत्र 22 एप्रिल रोजी मैत्री बुद्ध विहार, नारी रोड, नागपूर येथून झाली आणि ह्याचे उद्दिष्ट 1000 हून अधिक बौद्ध भिक्खूंना आरोग्य व पोषण जागृती चे सशक्ति प्रदान करणे आहे ज्यासाठी कदाचित शहरभरातील 100 बुद्ध विहारांमध्ये प्रवास करण्याची आवश्यकता असू शकते. डॉ.आंबेडकर सेमिनरीचे मुख्य धम्म प्रशिक्षक भदंत धम्मसारथी यांनी संपूर्ण समुह ला त्यांच्या मिशनचा सक्रिय भाग बनवण्याची आणि समाजात पोषण शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी नागपूरच्या विविध बुद्ध विहारांमध्ये जास्तीत जास्त भिक्षूंपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांची बांधिलकी द...

10 हजार से ज्यादा भक्तों ने लिया महाप्रसाद का लाभ -विदर्भ के 11 जिलों से आये भक्तों द्वारा रोग निदान,नेत्र जांच ,रक्तदान शिबिर में लिया लाभ

 10 हजार से ज्यादा भक्तों ने लिया महाप्रसाद का लाभ -विदर्भ के 11 जिलों से आये भक्तों द्वारा रोग निदान,नेत्र जांच ,रक्तदान शिबिर में लिया लाभ नागपुर. ((आनन्दमनोहर जोशी) श्राद्ध पक्ष के दौरान सोमवार की चतुर्थी को संकष्टी चतुर्थी से चतुर्दशी तक उत्सव मनाया जा रहा है.वहीँ महल स्थित सीनियर भोसला पैलेस महल में महाराजा ऑफ नागपुर ट्रस्ट के तत्वावधान मे 236 वें वार्षिकोत्सव पर मस्करया श्रीगणेश की विधिवत पूजा रोजाना शाम को राजपुरोहित राजेंद्र पुराणिक के हस्ते मंत्रोच्चारण किया जा रहा है.सरकारी मेडिकल कॉलेज डॉक्टर की टीम ने सफलतापूर्वक प्रयास किया. यहाँ इस दौरान विदर्भ के 11 जिलों से आये भक्तगणों ने स्वास्थ्य शिबिर का लाभ लिया. महाप्रसाद के दौरान अन्न का थालियाँ में उचित मात्रा में प्रसाद के रूप में लेकर जूठा नहीं छोड़ने के लिए सारंग,गणेश गरुड़ और कार्यकर्ताओं द्वारा उद्धोषणा करके निवेदन किये गए.इस विशेष अवसर पर श्रीमंत डॉ. राजे मुधोजी महाराज भोंसले, श्रीमंत रानी यशोधराराजे, श्रीमंत राजे रघुजी भोंसले, श्रीमंत राजे युवराज जयसिंहराव भोंसले,क़ानूनी सलाहकार अधिवक्ता प्रदीप देशमुख, हप्पेनिंग टुडे क...