केंद्रीय सेवानिवृत्त संघटना शाखा नागपूरची द्विवार्षिक सभा संपन्न.
प्रतिनिधी, अनिल के. बालपांडे, नागपूर
देवी अहिल्या मंदिर सभागृह, साठे मार्ग, धंतोली, नागपूर येथे अखिल भारतीय केंद्रीय सेवानिवृत्त संघटना हेडकॉटर पुणे, शाखा नागपूर यांच्या द्विवार्षिक सभेचे आयोजन दिनांक 3 नोव्हेंबर 2023 ला करण्यात आले होते.
1947 ला स्थापन झालेल्या या संस्थेचे पुणे हे मुख्यालय असून भारतातील पहिली पेन्शनर्स संस्था म्हणून परिचित आहे. सध्या 33 हजार पेन्शनर्स या संस्थेचे सभासद आहेत. ही संस्था भारत सरकारच्या पेन्शनर विभागातर्फे अधिकृत असल्यामुळे पेन्शनरच्या समस्यांचे लागलीच निराकरण होते. या संस्थेच्या शाखा भारतभर आहेत. खास करून तामिळनाडू, कर्नाटका आणि महाराष्ट्रात तर संपूर्ण जिल्ह्यातच आहे.
यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून श्री. एच.एफ. चौधरी, जनरल सेक्रेटरी, मुख्यालय पुणे तसेच श्री. मनोहर पतकी, असिस्टंट जनरल सेक्रेटरी, मुख्यालय पुणे यांच्यासह श्री. आर. एम .शेख, अध्यक्ष, नागपूर ब्रांच, श्री. आर. डब्ल्यू. हुकरे, सेक्रेटरी, नागपूर ब्रांच तसेच श्री गंगाधर नेरकर, ऑर्गनायझेशन सेक्रेटरी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
दीप प्रज्वलनानंतर अध्यक्षांचे प्रास्तविक झाले. तदनंतर दिवंगत सभासदांना श्रद्धांजली देण्यात आली. प्रमुख पाहुण्यांची ओळख व त्यांचा सत्कारा नंतर गतवर्षीच्या सभेचा वृत्तांत सादर करण्यात आला. पाहुण्यांच्या मनोगता नंतर वय वर्ष 75 च्या वरील सर्व सभासदांचा यावेळी शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
वर्ष 2023 ते 2025 पावेतो नवीन कार्यकारणीची निवड सुद्धा यावेळी करण्यात आली. आभार प्रदर्शनानंतर राष्ट्रगीताने या सभेचे समापन झाले.