तेली समाज वर वधू परिचय संमेलन.
प्रतिनिधी, अनिल के. बालपांडे, नागपूर.
मोरभवन, सीताबर्डी, नागपूर येथील विदर्भ हिंदी साहित्य संमेलन मधील अर्पण दालनात आज दिनांक 26 नोव्हेंबर 2023 ला तेली समाजातील सर्व शाखीय व सर्व क्षेत्रीय वर, वधू परिचय मेळाव्याचे आयोजन संयोजक तसेच संपादक श्री. राजेश पांडुरंग पिसे द्वारा करण्यात आले होते.
कर्मयोगी,, समाज रत्न, स्वर्गीय श्री. पांडुरंग पिसे स्मृती प्रित्यर्थ आयोजित या मेळाव्यास विदर्भातील तेली समाजातील वर, वधू तसेच त्यांचे पालक नेहमीच आवर्जून भाग घेतात. मागील 43 वर्षापासून हा उपक्रम संयोजक, राजेश पिसे द्वारा राबविल्या जात आहे.
इतकेच नसून समाजाला सवलती मिळण्याकरिता सदैव कार्यरत, सामूहिक विवाह सोहळ्याचे प्रचार तसेच प्रसार करणे. स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडून आलेल्या प्रतिनिधींचा सत्कार करणे, निशुल्क रोगदान शिबिर वगैरे सारखे सामाजिक कार्य केल्या जातात, तसेच करीत आहेत.
आज पावतो मुंबईला 11, पुण्याला 05, नाशिकला 02,वर्धेला 04, चंद्रपूरला 02, चिमूरला 02, वरोऱ्याला 01, भद्रावतीला 01, भंडाऱ्याला 02, पेट्रोल पंपला 04, तुमसरला 01, गोंदियाला 01, साकोलीला 02 मौदाला 01, बुटीबोरी ला 01, व नागपूरला 278 असे एकूण 319 वर वधु परिचय सम्मेलन घेऊन, सामाजिक कार्याचा इतिहास घडवित आहेत.
यावेळी मंचावर अतुल व्यवहारे, जालना, सुकुमार फटिंग, तिरोडा व वामनराव काटकर, हिंगणघाट.. यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पुढील मेळावा हा दिनांक 31 डिसेंबर 2023 ला दुपारी एक वाजून 45 मिनिटांनी याच स्थळावर आयोजित केल्या जाईल. इच्छुक समाज बांधवांनी नोंदणी तसेच प्रकाशना करिता 20 डिसेंबर 2023 पर्यंत कार्यालयाशी संपर्क करावा असे आवाहन राजेश पांडुरंग पिसे यांनी यावेळी केले.