अनाथालयातील मुलांनी साकारले हस्तकला प्रदर्शन *"उजाला"*
प्रतिनिधी, अनिल के. बालपांडे, नागपूर
श्रद्धांनंद पेठ, नागपूर येथील श्रद्धानंद अनाथालय ज्याला "आशेचे मंदिर" या लोकप्रिय नावाने सुद्धा ओळखले जाते.
1927 पासून स्थापन झालेले हे अनाथालय बुटी परिवारातील तिसऱ्या पिढीद्वारे जोपासले जात आहे.
दीपावलीच्या उपलक्षावर
येथील मुलांद्वारा *उजाला* या मथळ्याखाली खूपच सुंदर हस्तकला प्रदर्शन साकारले गेले आहे. ज्याचे उद्घाटन श्री. मुमक्का सुदर्शन, डीसीपी, क्राईम नागपूर यांच्या हस्ते नुकतेच पार पडले. यावेळी संस्थेच्या सहसचिव, गीतांजली बुटी यांनी पाहुण्यांना येथील मुलांद्वारे निर्मित उत्पादनाबद्दल तसेच त्यांच्या दिनचर्या व त्यांच्या कार्याबद्दल माहिती दिली. यावेळी डीसीपी कार्यालयातील कार्यरत कॉन्स्टेबल, पुरुषोत्तम नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी नोटबुक तसेच पेन मुलांना भेटवस्तू म्हणून दिल्यात.
हे प्रदर्शन दिनांक 2 नोव्हेंबर ते पाच नोव्हेंबर2023 दरम्यान सकाळी 10.30 ते सायंकाळी 06.00 पर्यंत सर्वांसाठीच उघडे आहे. येथील सर्जनशील कलात्मक तसेच नाविन्यपूर्ण उत्पादने ज्यामध्ये विशेष करून तोरण, आसन, हॅन्डबॅग, रंगीत पणत्या, आकाश कंदील असे विविध उत्पादने विक्रीस उपलब्ध असून आपण ते खरेदी करून येथील मुलांचे कौतुक करावे तसेच त्यांना प्रोत्साहित करावे असे आवाहन येथील सहसचिव श्रीमती. गीतांजली बुटी यांनी यावेळी केले.