अहिंसेच्या तत्त्वावर आधारित सत्याग्रहाचा मार्ग स्वीकारावा -राजेंद्र वनारसे
🖊️प्रविण जगताप 🖊️वर्धा जिल्ह्या प्रतिनिधी मो 9284981757
वर्धा:- मराठा असो की ओबीसी -भटके विमुक्त आरक्षण समर्थक असतो त्यांनीं 'सत्यासाठी आग्रह करावा पण अहिंसेच्या तत्त्वावर आधारित सत्याग्रहाचा मार्ग स्वीकारावा असे नम्र आवाहन वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथील सांयकाळी प्रार्थना सभेत सहभाग घेतल्यानंतर ओबीसी -भटके विमुक्त आत्मनिर्भर जागरण यात्रा समिती चे मुख्य संयोजक राजेंद्र वनारसे यांनी केले आहे . यावेळी त्यांच्या सोबत यात्रा समिती चे विदर्भातील सामाजिक युवा नेते अविनाश नवरखेले,हनुमंतराव मुदगल हे होते.गेली अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी श्री.मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या मराठा समाजहितासाठी सत्याग्रहाचा अवलंब केला आहे योग्यच आहे.परंतु त्यांच्या प्रमाणे न्याय मागण्याकरिता सत्याग्रहाचा सत्याग्रह करण्याऐवजी हिंसक वळण देणारे ही चुकीची भुमिका काहीजणांनी योग्य नाही . महाराष्ट्र राज्यातील राजकीय क्षेत्रातील मान्यताप्राप्त नेत्यांनी सत्तेसाठी वैचारिक मतभिन्नता असलेल्या सोबत युती आणि आघाडी करुन गेली चार वर्षे स्वतः ची जनसामान्यांमध्ये असलेली विश्वासाहर्ता गमावली आहे .