आनंदवनातील दिव्यांग बांधवांसोबत दिवाळी साजरी
🖊️प्रविण जगताप 🖊️वर्धा जिल्हा प्रतिनिधी मोबाईल :- 9284981757
* हिंगणघाट__ आनंदवनातील दिव्यांग बांधवांसोबत आनंदवन मित्र मंडळ हिंगणघाट येथील सदस्यांनी दिवाळी फराळ कपडे भांडे वाटप करून दिवाळी साजरी केली आनंदवनातील रुग्ण, आपुलकी प्रकल्पावरील वृद्ध व स्वरानंदवन संगीत रजनीच्या कलाकारांना यावेळी विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले याप्रसंगी प्रामुख्याने आनंदवनाचे विश्वस्त डॉ.विजय पोळ,सुधाकर कडू,महंत सुरेशजी शास्त्री, मंडळाचे अध्यक्ष हेमंत कुलकर्णी ,दिनेश अटेल ,असीम शेख उपस्थित होते. याप्रसंगी हेमंत कुलकर्णी यांनी आनंदवनातील बांधवांना नियमितपणे शक्य तेवढ्या मदतीचे आश्वासन देताना देतानाच येथील बांधवांसोबत दिवाळी साजरी करून दिवाळी चा आनंद द्विगुणीत होऊन ऊर्जा प्राप्त होते असे मत व्यक्त केले डॉ.विजय पोळ यांनी दवाखान्यातील रुग्णांच्या वतीने मंडळाचे आभार व्यक्त करतानाच बाबा आमटे यांच्या पुण्यकर्मात समाजातील सर्वांनी समिधा टाकून हातभार लावणे गरजेचे असल्याचे सांगितले सुधाकर कडू यांनी वृद्धांना वाटप करण्यात आलेल्या मिठाई पेक्षा त्यांना मिळालेल्या आपुलकीमुळे झालेला आनंद अवर्णनीय असल्याचे प्रतिपादन केले. याप्रसंगी संजय शेजवळकर यांनी आनंदवनातील भोजनालयाच्या मदतीसाठी दिलेली उपयुक्त भांडी प्रदान करण्यात आली प्रकाश स्टोअर्स चे संचालक महेंद्र डालिया यांचे वतीने साड्यांचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी मनोज पारेख,प्रफुल्ल तन्ना,संदेश चोरडिया, देवेंद्र मुंदडा, डॉक्टर राहुल देशपांडे, रमेश भाई पटेल ,संजय चंदाराणा,माजी जिल्हाधिकारी कमलेश सोनाले,ललीत जोबनपूत्रा,तुकाराम मुंढे यांनी सहकार्य केले.