राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवानेते आमदार रोहीतदादा पवार यांची पुणे ते नागपूर पायदळ 'युवा संघर्ष यात्रा
राज्यातील तरुण बेरोजगार युवक तथा शेतकर्यांच्या याकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरीता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवानेते आमदार रोहीतदादा पवार यांनी पुणे ते नागपूर पायदळ 'युवा संघर्ष यात्रा' सुरु
🖊️प्रविण जगताप 🖊️वर्धा जिल्हा प्रतिनिधी मोबाईल :- 9284981757
राज्यातील तरुण, बेरोजगार युवक तथा शेतकर्यांच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडून याकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरीता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवानेते आमदार रोहीतदादा पवार यांनी पुणे ते नागपूर पायदळ 'युवा संघर्ष यात्रा' सुरु केली आहे. या संदर्भात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय, वर्धा येथे मी बैठक आयोजित केली होती. दि. 6 डिसेंबर 2023 ला युवा संघर्ष यात्रे चे पुलगाव येथे आगमन होणार असून धोत्रा, वर्धा, सेवाग्राम, पवनार, सेल, हिंगणी या मार्गाने दि. 8 डिसेंबर ला नागपूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. आज या बैठकीत युवा संघर्ष यात्रे संदर्भात नियोजन करण्यात आले. बैठकीला माजी आमदार राजूभाऊ तिमांडे, आफताब भाई खान, पंकजभाऊ घोडमारे, संदीपभाऊ किटे, प्रा. खलीलजी खतीब, मिलिंदभाऊ हिवलेकर, संदीपभाऊ भांडवलकर, धनराजभाऊ तेलंग, नावेदभाई शेख, प्रशांतभाऊ कुत्तरमारे, विनोदभाऊ पांडे, गणेशभाऊ कामनापुरे, अर्चीत निघडे, राहुल घोडे, संजयभाऊ काकडे, प्रणय कदम, हरीश काळे, रामुभाऊ पवार, नरेशभाऊ खोडके, रवी संगतानी, सचिन ठाकरे, संकेत तळवेकर, रोशन राऊत, प्रज्वल धंदरे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.