महाराष्ट्राच्या व्हॉलीबॉल संघाची निवड
🖊️प्रविण जगताप 🖊️वर्धा जिल्हा प्रतिनिधी मोबाईल :- 9284981757
वर्धा, दि.10 : जिल्हा क्रिडा संकुल येथे नुकत्याच राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेनंतर महाराष्ट्राच्या संघांसाठी खेळाडूची दि.8 व 9 नोव्हेंबर रोजी निवड चाचणी घेण्यात आली. या निवड चाचणीत निवड समिती सदस्य प्रशांत दोंदल, प्रभाकर ढोक, संदिप उईके यांच्याकडून महाराष्ट्राचा संघ निवडण्यात आला असून तालुका क्रिडा अधिकारी संजय कथळकर यांनी सदर संघ जाहीर केला आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रिडा परिषद व जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रिडा अधिकारी अविनाश पुंड यांच्या मार्गदर्शनात दि.6 ते 9 नोव्हेंबर या कालावधीत जिल्हा क्रिडा संकुल येथे 14 वर्ष वयोगटातील मुले व मुलींच्या राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतून महाराष्ट्राच्या संघासाठी खेळाडूची निवड करण्यात आली.
मुलांच्या संघामध्ये यश सुनिल निर्मल अहमदनगर, शेख सुवेज जावेद बीड, चिन्मय किशोर मेश्राम अहमदनगर, मोहम्मद हुसेन शेख बीड, गोपाल नाक्या पावरा अहमदनगर, श्रेयस भैरु खांडेकर धाराशिव, ध्रुव सुधीर ठाकरे नागपूर, मो. सेहान आसिफ मुल्ला सांगली, शौर्य प्रशांत माकोजे अहमदनगर, कैसर आल्म मोहम्मद सलीम नाशिक, यश धनंजय लोही नागपूर व सार्थ सुनिल वडस्कर चंद्रपूर यांची 14 वर्ष वयोगटातील मुलांच्या संघासाठी निवड करण्यात आली.
मुलींच्या संघामध्येअनुष्का संजय जाधव सांगली, तनुश्री दिलीप जाधव सांगली, विशाखा सतीश मोरे वर्धा, वैष्णवी चंद्रकांत आदलिंगे सोलापूर, सृष्टी प्रकाश बल्की चंद्रपूर, संध्या शशिकांत कानवटे लातूर, सिध्दी उदय सगस चंद्रपूर, शर्वरी निलेश निचत अमरावती, सानवी राजेंद्र कोसे सांगली, यशस्वी रजनीकांत दुपारे वर्धा व स्वरा प्रशांत सुर्वे चंद्रपूर या मुलींची महाराष्ट्राच्या संघासाठी निवड करण्यात आली आहे, असे जिल्हा क्रिडा अधिकारी यांनी कळविले आहे.