*उदयनगर चौकात नमो महारोजगार मेळाव्याला उत्कृष्ट प्रतिसाद*
नागपूर :दक्षिण नागपूर येथील भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 34, सौ. माधुरीताई प्रवीण ठाकरे यांच्या जनसंपर्क कार्यालया समोर पेंडाल टाकून नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र शासनातर्फे नमो महारोजगार मेळाव्याच्या अभियानास प्रारंभ झाला असून या मेळाव्यात शेकडो युवक, युवतींनी, बेरोजगारांनी नोंदणी करून स्टॉल वरील रजिस्ट्रेशन केलेत. गरजू, बेजरोजगार, विद्यार्थ्यांनी या मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता. श्रद्धानंदपेठ नागपूर आयटीआय चे श्री. गणेश बांते व सौ.एम.पी.गंगारे (शासन अधिकारी) यांच्या नेतृत्वाखाली आज बुधवार दि.२९ नोव्हेंबर रोजी, नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन उदयनगर चौकातील करण्यात आले असून त्यावेळी सौ.माधुरीताई प्रवीण ठाकरे, बाबाराव तायडे, आणि सुरज दुबे यांची उपस्थिती होती. तसेच काशिनाथ नखाते, संदीप गाकरे, मधुकर गोतमारे, नीरज पांडे, नरेश सालपे, डॉ.राजेश कुऱ्हाडे, कैलास कोरडे, वितीन जाधव, बाळू साखरे, बीपीन सार्वे आणि प्रवीण ठाकरे यांनी खूप परिश्रम घेतलेत.