हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा बॅरेज प्रकल्पाच्या कामास गती द्या माजी आमदार प्रा.राजु तिमांडे.
✒️प्रवीण जगताप ✒️वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो 9284981757
*उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ०२ महिन्यात प्रकल्पाचे काम सुरू करण्याचे दिले होते आश्वासन*
वर्धा जिल्ह्यातील वर्धा नदीवर हिंगणघाट तालुक्यात असलेल्या "आजनसरा बॅरेज" प्रकल्पास सन २०२३-२४ आर्थिक नियोजनात निधी देण्याबाबत माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली व निवेदनाद्वारे मागणी केली आहे. तसेच उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ०२/१०/२०२३ ला आजनसरा या गावी सदर प्रकल्पाचे कामे ०२ महिन्यात सुरू होईल असे आश्वासन दिले असून त्यानुसार प्रकल्पाच्या कामास गती देण्यात यावी व प्रकल्पास आवश्यक निधी देण्यात यावे अशी मागणी भेटी दरम्यान करण्यात आली.त्यावेळी सोबत हिंगणघाट कृ.उ.बा.सचे सभापती ॲड.सुधीर कोठारी, इंटकचे सेक्रेटरी आफताब खान, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विनोद वानखेडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष विठ्ठल गुळघाने उपस्तीत होते.तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री अजित पवार यांना सुद्धा पत्र देण्या आले आहे.