गिमाटेक्स इंडस्ट्रीज कामगार / कर्मचारी निवडणूक घेण्यात आली.त्या ठिकाणी हिंगणघाट येथील कामगार आघाडीचे 15 पैकी 13 अधिकृत उमेदवार विजयी
*अबकी बार भाजपा जिल्हे के बाहर असे नारे देत गुलाल उधळत विजय बणवले*
🖊️प्रविण जगताप 🖊️वर्धा जिल्हा प्रतिनिधी मोबाईल :- 9284981757
हिंगणघाट येथील गिमाटेक्स इंडस्ट्रीज प्रायव्हेट लि. कामगार / कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या. करिता निवडणूक घेण्यात आली.त्या ठिकाणी हिंगणघाट येथील कामगार आघाडीचे अधिकृत उमेदवार मा. माजी आ. राजुभाऊ तिमांडे व कृषी उत्पन्न बाजार समिती,हिंगणघाट चे सभापती मा. सुधीरबाबू कोठारी यांच्या नेतृत्वात एकूण 15 उभे करण्यात आले होते .त्याकरिता निवडणूक दिनांक :-10 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी वेळ 08 ते 05 पर्यंत मतदान घेण्यात आले. विरुद्ध भाजपचे मा. आमदार समीर कुणावर यांनी नारळ या चिन्हावर 15 उमेदवार उभे केले होते .परंतु कामगार आघाडीचे 15 पैकी 13 उमेदवार सिलेंडर या चिन्हावर निवडून आले आहे. त्यात भाजपाचा दारुण पराभव करण्यातआला या निवडणुकीतून परिवर्तनाची लाट सुरू झाली आहे . त्या ठिकाणी सर्व मतदार व कार्यकर्ते " अबकी बार भाजपा जिल्हे के बाहर " असे नारे देत होते. म्हणून शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे )या पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीच्या रूपात त्या सर्वांचे अभिनंदन , स्वागत करित आहे. व पुढील वाटचालीकरिता त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहे*.
त्यापैकी राखीव महिला उमेदवार मधील, निवडून आलेल्या श्रीमती रेश्मा ईश्वरराव बेले यांचे अभिनंदन करण्याकरिता तालुका प्रमुख श्री. सतीश धोबे ,उपतालुका प्रमुख प्रकाश अणासाने, माजी नगरसेवक मनिष देवडे, भास्कर ठवरे ,अनंता गलांडे, अविनाश धोटे, नितीन वैद्य ,दिलीप वैद्य,निलेश भगत,आकाश बेले,सौ. हर्षाताई बेले व इतर शिवसैनिक उपस्थित होते.या कामगार आघाडी च्या सर्व सदस्यांना निवडुन आण्यात रक्ताचे पाणी केले ते राहुल जाधव,देविदास कुबडे, दिलीप जाधव, भारत ठोंबरे, अजय भेदुरकर,नरेश खेकडे, सुनील बलखंडे, गजानन राऊत, हरी धोटे, सुनंदाताई बेलेकर, संघमित्राताई टेंबुर्णे,ज्योतीताई राऊत,वंदनाताई भगत, नंदाताई बोबाटे, कैलास वैरागडे, केशव रघाटाटे,प्रमोद कुरेकर, नितीन हुलके, पिंटू सातपुते, गजानन धोटे, विनोद कुटे, कुणाल भगत, धर्मपाल शंभरकर, नितीन विरुळकर, गजानन नौकरकार,दत्तू नौकरकार,मंगेश घाटे, विनोद ठाकरे, सुनील मुन, प्रवीण ताजने, अलपेश बेहरे, विनोद ठाकरे,वसंता तुमडे, चंद्रकांत सुरजूसे, सतीश चेपे, दिवाकर घोटेकर, सुभाष बानमारे,संदेश खोडे यांचा आभार आणि अभिनंदन शिव सेनेच्या वतीने करण्यात येते.येणाऱ्या काळात कामगार युनियन च्या निवळणुकीत कामगार आघाडी ला मोठया प्रमाणावर यश मिळेल यात तिळमात्र शंका नाही।