एन.सी.सी. दिनानिमित्त छात्रांचे रक्तदान शिबिर.
प्रतिनिधी, अनिल के. बालपांडे, नागपूर.
"एकता आणि शिस्त" हे ब्रीदवाक्य असलेल्या जगातील सर्वात मोठी गणवेशदारी युवा संघटना म्हणून नावाजलेले "राष्ट्रीय कॅडेट कोर" ही संघटना आपला 75 वा वर्धापन दिन साजरा करीत आहे.
या दिनानिमित्त 20 महाराष्ट्र बटालियन, कमला नेहरू महाविद्यालय आणि ब्लड सेंटर, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने कमला नेहरू महाविद्यालय सक्करदरा, नागपूर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन दिनांक 27 नोव्हेंबर 2023 ला करण्यात आले होते.
एन.सी.सी. ही स्वयंसेवी संघटना असून ही थलसेना, नौसेना तसेच वायुसेने शी सहसंलग्न आहे. महाराष्ट्रात यांचे मुख्यालय मुंबई येथे असून एनसीसी ग्रुप नागपूरला यांचे 09 आर्मी विंग, 01 नेवल विंग युनिट, 01 पुन्हा आरोहित पशुवैद्यकीय विंग तर 01 एअर विंग समाविष्ट आहेत. नागपूर ग्रुप मध्ये विदर्भातील 200 पेक्षा जास्त शाळा आणि महाविद्यालय असून जवळपास 15000 मुले मुली छात्र आहेत.
येथील छात्र राष्ट्र उभारणीसाठी फार मोठी भूमिका पार पाडतात. इतकेच नसून विविध क्षेत्रात जसे सामाजिक सेवा, जनजागृती मोहीम मध्ये मदत करून आपले योगदान देत असतात.
दिवसभर चाललेल्या या रक्तदान शिबिरात जवळपास 200 कॅंडेट यांनी सहभाग घेऊन रक्तदान केले. यावेळी हेडकॉटर एनसीसी चे प्रमुख ग्रुप कॅप्टन, खुशाल व्यास मुख्य अतिथी म्हणून तर 20 महाराष्ट्रीयन बटालियन चे कमांडंट, कर्नल, विकास एस. शर्मा, एडमिन ऑफिसर, कर्नल, मंजू मुजुमदार, अप्रॉसिटीग सुभेदार मेजर, मंगल सिंग, कमला नेहरू महाविद्यालयाचे प्राचार्य, दिलीप बडवाईक, एनसीसी इन्चार्ज, कॅप्टन, प्रवीण सोनटक्के, कॅप्टन तेजसिंग जगदाळे (काटोल)तसेच मेडिकल चमू व हेडकॉटर स्टाफ उपस्थित होते.