श्रीहरी नगरात तान्हा पोळा साजरा
नागपूर : दरवर्षीप्रमाणे श्री हरी नगर येथील श्री संकट मोचन ह
नुमान मंदिराच्या प्रागंणात साजरा करण्यात आला. जवळजवळ 250 नंदीबैल या तान्ह्या पोळ्यात सहभागी झाले होते. विविध वेशभूषा करून लहान मुले, मुली यामध्ये सहभागी झाले होते. प्रथम दहा मुलांना वेशभूषेसाठी तसेच सुंदर नंदीबैलाला नगदी पारितोषिक हनुमान मंदिर पंच कमिटीचे अध्यक्ष विठ्ठलराव घोडे च्यावतीने देण्यात आले. याप्रसंगी श्री रामभाऊ कावडकर(समाजसेवक) प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी सुरेश उरकुडे, रामेश्वर भुते, रामदास कोल्हे, घनश्याम ढोके , डॉ.अशोक मंदे, रामदास कोल्हे, कवडू इटनकर, रामकृष्ण कोल्हे, वासुदेव चामाटे, दुर्गाप्रसाद कावडकर, अशोक माहुरे, गुरनुले साहेब,विजय लोणारे यांनी विशेष परिश्रम घेतलेत.