शिवशक्ती नगर 02, दक्षिण नागपूर मध्ये भव्य ताना पोळा आयोजन संपन्न..
दक्षिण नागपूर मधील शिवशक्ती नगर 02 येथे हनुमान मंदिर गार्डन परिसरात शिवशक्ती महिला मंडळ तसेच सर्व नागरिकांतर्फे मध्ये भव्य ताना पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सदर ताना पोल्यामध्ये जवळपास 100 च्यां वर स्पर्धकांनी नंदीबैल सजावट तथा वेशभूषा स्पर्धेत भाग घेतला होता. सदर स्पर्धेत प्रथम बक्षीस सायकल, तसेच वेशभूषा स्पर्धा व नंदीबैल सजावट स्पर्धा प्रत्येकी द्वितीय व तृतीय पारितोषिक म्हणून स्टडी टेबल व कॅरम बोर्ड देण्यात आले. सदर स्पर्धेचे आयोजन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, दक्षिण नागपूरचे आमदार मोहनजी मते, माजी आमदार सुधाकरजी कोहळे, सौ ज्योतीताई देवघरे, अध्यक्ष, भाजपा,महिला आघाडी दक्षिण नागपूर यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली करण्यात आले. सदर कार्यक्रमास प्रतिष्ठित नागरिक मनोहरजी सपकाळ, गजाननजी शेळके, देवराव प्रधान, पराग धर्माधिकारी, प्रदीप गणोरकर उपस्थित होते सदर स्पर्धेत खूप सुंदर अशा वेशभूषा करून स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. सदर कार्यक्रमास प्रत्येक स्पर्धकाला प्रोत्साहन पर बक्षीस देण्यात आले. स्पर्धकांनी श्रीकृष्ण, विठ्ठल रुक्माई , बाल हनुमान, महादेव, अंतराळवीर चंद्रयान, शेतकरी, समाजसेवक, इतर देवी देवता, गौतम बुद्ध अशा वेगवेगळ्या वेशभूषा परिधान करून उपस्थितांची मने जिंकली व वा-वा मिळवले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजन समिती म्हणून सौ मंजुषा गायधने, सौ.अबोली घडोले, सौ सुवर्णा नंदुरकर, सौ कविता आष्टीकर, सौ मंजुषा कांदे, ज्योती शेलोटे, माया हिंगे, ज्योती गायकवाड, हेमंत वाघाडे,किशोर कांदे, आकाश वाघाडे, सुरेंद्र कांदे तसेच सर्व शिवशक्ती नगर मधील नागरिक यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे संचालन व आभार विकास गायधने यांनी मानले.