नांदेड येथे श्रावनमासा निमित्ताने रंगतो भजनाजा कार्यक्रम
लाखांदूर : प्रेमआनंद हटवार :-लाखांदूर तालुक्यातील नांदेड येथे श्रावण मासा निमित्य महिनाभर गावातील भजनी मंडळातर्फे दररोज सांयकाळी भजन आयोजित करण्यात येतो. संगित ऐकल्यावर मनावर असणारा ताण कमी होतो. त्याचप्रमाणे भजन म्हणजे मनाची एकाग्रता शब्द,अर्थ, विचार संगीत, स्वर, ताल, लय, बाघ, टाळ या सर्वांचे एकत्रीकरण म्हणजे भजन होय. कारण भजनाला संगीताच्या स्वरांची आणि नादमयतेची साथ असते. भजन म्हणजे परमेश्वराचे नामस्मरण, भक्तीत तल्लीन भजनात होताना माणूस आपले अस्तित्व विसरून ईश्वर चरणी लीन होतो. अशाच भजनातून भक्तीच नव्हे तर समाज प्रबोधन आणि ऐक्याची भावना निर्माण होते.संपूर्ण श्रावण महिना भर नित्य नियमाने सांयकाळी भजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. त्यावेळी गावातील मंडळी ताळ, ढोलक, टाळ्यांच्या गजरात भजन गाईल जातो. यामध्ये सहभागी असणारे नांदेड प्लॉट येथिल भजनी मंडळी त्यावेळी उपस्थित भजनी मंडळी श्री गुरुदेव भक्त पांडुरंग महाराज वैलथरे , देवराम नागपुरे (ढोलक मास्तर ), किरण नागपुरे (गायक) , मंदिराचे पुजारी लवाजी मेश्राम ,एकनाथ नागपुरे ,गोपालजी नागपुरे , योगेश चोपकार ,अंकुश कुर्झेकार ,प्रवीण हटवार , मंगेश चोपकार , प्रज्जवल साठवणे ,वेदांत वैद्ये , हरजीवन बावनकर , मुलचंद हजारे ,राजू साठवणे , जिराबाई नागपूरे , सायत्राबाई साठवणे , बेबीबाई पडोळे, शोभाबाई चोपकार आणि इतर गावकरी मंडळी उपस्थित होते.